सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल ७ हजार कोटींची फसवणूक; ८९ टक्के आरोपी मात्र मोकाटच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:27 IST2025-03-05T11:26:36+5:302025-03-05T11:27:22+5:30

धक्कादायक म्हणजे एकूण ७,६३४ कोटी रुपयांपैकी ६ हजार कोटी रुपयांची फसवणूक एकट्या पुणे शहरात झाली आहे.

cybercrime fraud of rs 7000 crore 89 percent of accused go free | सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल ७ हजार कोटींची फसवणूक; ८९ टक्के आरोपी मात्र मोकाटच

सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल ७ हजार कोटींची फसवणूक; ८९ टक्के आरोपी मात्र मोकाटच

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात २०२४ या केवळ एक वर्षात सायबर चोरांच्या टोळ्यांनी तब्बल ७ हजार ६३४ कोटी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. या गुन्ह्यांमध्ये केवळ ११ टक्के आरोपींनाच अटक करण्यात आली असल्याचे वास्तवही यानिमित्ताने समोर आले. भाजपचे मोहन मते आणि अन्य आमदारांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. धक्कादायक म्हणजे एकूण ७,६३४ कोटी रुपयांपैकी ६ हजार कोटी रुपयांची फसवणूक एकट्या पुणे शहरात झाली आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती फडणवीस यांनी दिली. राज्यात एकूण ५० सायबर पोलिस ठाणे कार्यान्वित आहेत. त्यामध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छ.संभाजीनगर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर व नांदेड येथे न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाअंतर्गत अत्याधुनिक संगणक गुन्हे विभाग कार्यरत आहेत. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. सायबर गुन्ह्यांच्या विश्लेषणासाठी ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन डिजिटल फॉरेन्सिक’ ही  अत्याधुनिक प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा; पुणे येथे सुरू करण्यात आले आहे. संगणक गुन्हे विभागातील प्रलंबित प्रकरणांचे जलदगतीने विश्लेषण करण्यासाठी ‘सेमी-ऑटोमेटेड प्रोसेसिंग’ प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

सायबर चोरांनी आतापर्यंत अनेक लोकांना गंडा घातला आहे. काही लोकांना हा स्कॅम असल्याचं लगेच लक्षात येतं पण अनेक लोकं आजही या जाळ्यात फसतात.  

नवी मुंबईत सायबर सुरक्षा प्रकल्प

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महापे; नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचा सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या ठिकाणी राज्यभरातील सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल सायबर पोलिस ठाण्यासह सहा प्रमुख विभाग कार्यरत असतील अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.  या प्रकरणात सायबर चोर नकली पोलीस किंवा कस्टम अधिकाऱ्यांना कॉल करतात. ते मनी लाँड्रिंग किंवा ड्रग्जच्या सारख्या आरोपांमध्ये गुंतल्याचा दावा करतात. त्यानंतर लोकं घाबरतात आणि या सायबर चोरांना पैसे पाठवतात.

दाखल गुन्हे अटक आरोपी फसवणूक झालेली रक्कम 

मुंबई शहर    ४,८४९    ७५७    ८,८८,२९,२३,०९५
ठाणे शहर    ६८०    १३    १,७४.०,४.३६.००६
नागपूर शहर    २१२    ०५    ६३,८५,०९,५०१
पुणे शहर    १५०४    ०९    ६०,०७९,३०,४३९८
राज्यात एकूण    ८९७४    १००७    ७६,३४,२५,४६,५०८

Web Title: cybercrime fraud of rs 7000 crore 89 percent of accused go free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.