Cyclone Nisarga: सावधान मुंबईकर! पुढील ६ तास महत्त्वाचे; जिथे असाल तिथे सुरक्षित राहा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 01:22 PM2020-06-03T13:22:43+5:302020-06-03T13:23:25+5:30
वादळाच्या धडकण्याआधी सुरुवातीचे ६ तास आणि नंतरचे ६ तास फार महत्वाचे आहेत, त्यामुळे लोकांना बाहेर न जाण्याचे आवाहन करण्यात आले
मुंबई - ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये अम्फानच्या विध्वंसानंतर अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ठोठावणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार वादळ मुंबईच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या वादळाचा वेग सुमारे ९०-११० किमी प्रतितास असेल, जी १२० किमी प्रतितास वेगापर्यंत जाऊ शकेल. एनडीआरएफने लोकांना या चक्रीवादळापासून सतर्क राहण्यास सांगितले आहे.
एनडीआरएफचे डीजी एसएन प्रधान म्हणाले की, वादळाच्या धडकण्याआधी सुरुवातीचे ६ तास आणि नंतरचे ६ तास फार महत्वाचे आहेत, त्यामुळे लोकांना बाहेर न जाण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. एअर व्हाइस मॉर्टल जीपी शर्मा म्हणाले की, अलिबाग, पालघर आणि मुंबई येथे वादळामुळे पाऊस सुरू झाला आहे. हे पुढील काही सुरु राहणार असून त्याची तीव्रता वाढत जाईल. वादळ जसजसं पुढे सरकेल तसतसे या भागात जोरदार वारे वाहू लागतील. रात्री १२ ते ४ पर्यंत वादळ तीव्र स्वरुपात येणार आहे.
#WATCH: #CycloneNisarga makes landfall along Maharashtra coast, process will be completed during next 3 hours. Visuals from Mumbai. pic.twitter.com/YKWizX82lC
— ANI (@ANI) June 3, 2020
अम्फानसारखं निसर्ग चक्रीवादळ विनाशकारी मानलं जात नसलं तरी परंतु गुजरात आणि महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात बरेच नुकसान होण्याची अपेक्षा आहे. अरबी समुद्रात वादळ तयार झाल्यामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळतील. राज्य सरकारने मच्छीमारांना इशारा दिला असून त्यांना समुद्राच्या किनाऱ्यावर न जाण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच लोकांनी घरातून बाहेर पडू नका असं आवाहन केले आहे.
#CycloneNisarga will cross Maharashtra coast between Harihareshwar & Daman, very close to Alibaug between 1 pm to 4 pm; Latest visuals from Alibaug. pic.twitter.com/39ouVK0n9L
— ANI (@ANI) June 3, 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Cyclone Nisarga Live Updates: 'निसर्ग' चक्रीवादळाचा वेग वाढला, एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता
निसर्ग' चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची टीम सज्ज
भारताच्या पंतप्रधानांसाठी बनवलेलं खास ‘सुपर प्लेन’ उड्डाणासाठी सज्ज; कसं असेल सुरक्षा कवच?
हजारोंच्या गर्दीतही कोरोना संक्रमित रुग्ण शोधणार; भारतीय विद्यार्थ्यांनी बनवला ‘असा’ अविष्कार!
लॉकडाऊनमध्ये अडकले हिंदू नवरीचं कुटुंब; मुस्लीम कुटुंबाने कन्यादान करत पार पाडलं लग्न
कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट; ‘या’ देशात रक्त पिणाऱ्या किड्यांचा हल्ला!