निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 10:05 PM2020-06-03T22:05:13+5:302020-06-03T22:07:07+5:30

वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू

cyclone nisarga hits mahavitaran | निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका

googlenewsNext

मुंबई : जोरदार वादळी वा-यासह आलेल्या निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळ्ले असून वीजपुरवठा रवंडित झाला आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू केले आहे.

निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररूप बघता महावितरणचे किती नुकसान झाले असेल याचा अंदाज सध्याच घेता येणार नाही. निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी महावितरणने बऱ्याच ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने उरण जीटीपीएस-२२० किव्हो. या उपकेंद्रासह कांडलगाव, पाबरा व थल या प्रत्येकी १०० कि.व्हो. उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या उरण, अलीबाग, मुरूड, तळा, मानगाव, मसाळा, श्रीवर्धने व गोरेगाव या तालुकाच्या ठिकाणी असलेल्या २२ कि.व्हो. उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद केला होता. या वीज बंदमुळे आठ तालुक्यातील सुमारे २ लाख ६८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. 

६ बाय ६  उंचीचे ३ खांब गोंडघर इनकमर वीजवाहिन्या तुटून खाडीत कोसळल्या. गोरेगाव उपविभागअंतर्गत येणाऱ्या कांदलगाव उपकेंद्राच्या उच्चदाब वाहिन्या जोरदार वाऱ्यामुळे बंद करण्यात आल्या  होत्या.  चक्रीवादळामुळे अंबरले येथील एक रोहीत्र आणि ३ उच्चदाब खांब कोसळून पडले. वडाचा कोंड येथे एका रोहित्राचा खांब वाकला. लोणेरे येथील एक लघुदाब खांब कोसळून पडला. वाशी येथील 22 के. व्ही फीडर ट्रिप झाला होता. वाशी येथील सेक्टर १७ मध्ये लोंढे मामा खानावळजवळील लघुदाब वाहिनीवर झाड पडले होते. नावाडा येथे देखील एक उच्चदाब खांब कोसळून पडला. करंजाडे, बौध्दवाडा रस्त्यालगतचे तसेच घोटगाव येथील खांबावर झाड पडल्याने खांब कोसळून पडलेत. तुर्भे एम.आय.डी. सी. येथील 22/22 के व्ही. सबस्टेशनची कंपाउंड भिंतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

कल्याण परिमंडलात निसर्ग चक्री वादळासह झालेल्या पावसाने विविध भागात वीजपुरवठा बाधित झाला उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला. याशिवाय झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बाधित झाला. कल्याण पश्चिममधील बारावे, रामबाग, शिवाजी चौक, रहेजा, कल्याण पूर्वमधील वालधुनी, ठाकुर्ली, काटे मानिवली, चिंचपाडा, डोंबिवलीतील कोपर रोड, नांदीवली, आजदे, नवपाडा भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. कल्याण मंडल दोन अंतर्गत येणाऱ्या बदलापूर, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ याठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. वसई मंडल वाड्यातील कांही भाग व अर्नाळा परिसरात वीजपुरवठा बाधित झाला होता.मंगळवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसात फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदाराचे कामगार अहोरात्र काम करीत आहेत. 

 पुणे जिल्ह्यात सकाळपासून सुरु असलेल्या ‘निसर्ग’ वादळाच्या थैमानात वीजयंत्रणेवर मोठा आघात झाला आहे. वीजयंत्रणेवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार सुमारे ५४० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये प्रामुख्याने मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील 340 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे शहराच्या विविध भागात तसेच पिंपरी चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला.

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे विजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला होता.  याशिवाय झाडाच्या फांद्या वीजवाहिन्यांवर  पडल्याने व वाऱ्यामुळे वीजतारा तुटल्याने वीजपुरवठा बाधित झाला.कल्याण पश्चिममधील बारावे, रामबाग, शिवाजी चौक, रहेजा, कल्याण पूर्वमधील वालधुनी, ठाकुर्ली, काटे मानिवली, चिंचपाडा, डोंबीवलीतील कोपर रोड, नांदीवली, आजदे, नवपाडा भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुधवारी दुपारी तेजश्री फीडर बंद ठेवण्यात आला होता. बदलापूर, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ याठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. वाड्यातील काही भाग व अर्नाळा परिसराचा वीजपुरवठा बाधित झाला होता. मंगळवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसात फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदाराचे कामगार अहोरात्र काम करीत आहेत. 
 
निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणच्या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे चक्री वादळ राज्यात दोन दिवस घोंघवर असून या वादळाचा सामना करण्यास वीज कंपन्या सज्ज आहेत. वादळाच्या अनुषंगाने एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून संचालक दर्जाचा अधिकारी नोडल अधिकारी या  घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे. नैसर्गिक आपत्ती पासून होणारे नुकसान हे वादळाच्या तीव्रतेवर अवलंबून असून प्रभावित भागांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे.

Web Title: cyclone nisarga hits mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.