Cyclone Nisarga:...मग ‘ते’ देखील सुरक्षित राहतील; मनसे नेते अमित ठाकरेंचा लोकांना ‘मोलाचा सल्ला’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 03:30 PM2020-06-03T15:30:39+5:302020-06-03T15:31:40+5:30

फक्त माणसांनाच नव्हे तर रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांनाही त्याचा फटका बसणार आहे.

Cyclone Nisarga: MNS leader Amit Thackeray gives 'valuable advice' to people pnm | Cyclone Nisarga:...मग ‘ते’ देखील सुरक्षित राहतील; मनसे नेते अमित ठाकरेंचा लोकांना ‘मोलाचा सल्ला’

Cyclone Nisarga:...मग ‘ते’ देखील सुरक्षित राहतील; मनसे नेते अमित ठाकरेंचा लोकांना ‘मोलाचा सल्ला’

googlenewsNext

मुंबई – राज्यात कोरोना संकटापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचं संकटही उभं राहिलं आहे. या वादळामुळे अलिबाग, रायगड, मुंबई, ठाणे, गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचणार आहे. राज्य सरकारने या संकटाचा सामना करत अनेकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दलाच्या टीम तैनात आहेत.

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी लोकांना आवाहन केले आहे की, वादळामुळे अतिवेगवान वारे वाहणार आहे, त्यामुळे गरीब आणि बेघर लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. फक्त माणसांनाच नव्हे तर रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांनाही त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरच्या प्राण्यांना तुमच्या इमारतीच्या आवारात आश्रय घेऊ द्या, त्यामुळे ते सुरक्षित राहतील अशी विनंती त्यांनी लोकांना केली आहे.

तसेच मला पूर्ण कल्पना आहे की, अनोळखी लोकांना इमारतीत घेणे आपल्यापैकी अनेकांना शक्य होणार नाही, पण एकदा का हे चक्रीवादळ संकट निघून गेलं. तर आपण सर्वांनी घराबाहेर पडून गरजूंना मदत करायला हवी. कुणाला जेवण, तर कुणाला औषध उपलब्ध करुन द्यायला हवीत. एक जबाबदार नागरीक म्हणून या संकटकाळात आपल्याला जे काही मदतकार्य करणं शक्य असेल ते आपण करायला हवं. आपला एक लहानसा प्रयत्नही एखाद्याच्या जीवनात खूप मोठा बदल घडवू शकतो असा विश्वास मनसे नेते अमित ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात चक्रीवादळ धडकलं आहे. पुढचे तीन तास हे वादळ राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. हे वादळ रायगड, मुंबई, ठाणे येथून पुढे सरकणार आहे, या भागात वीज आणि  दूरध्वनी तसेच संपर्क साधनांच्या तारांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोठ-मोठी झाडे, उन्मळून पडण्याची, फांद्या कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.  पूर्व मध्य अरबी समुद्रातले  निसर्ग हे तीव्र चक्रीवादळ गेल्या सहा तासात उत्तर पूर्वेकडे ताशी 13 किलोमीटर वेगाने सरकले आहे. आज दुपारपर्यंत रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग जवळून ताशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग ताशी 120किलोमीटर पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Cyclone Nisarga Live Updates: निसर्ग चक्रीवादळ मुंबई, ठाण्याच्या दिशेनं; जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्यानं अनेक भागांत झाडं कोसळली

सावधान मुंबईकर! पुढील ६ तास महत्त्वाचे; जिथे असाल तिथे सुरक्षित राहा

भारताच्या पंतप्रधानांसाठी बनवलेलं खास ‘सुपर प्लेन’ उड्डाणासाठी सज्ज; कसं असेल सुरक्षा कवच?

कौतुकास्पद! फक्त एका विद्यार्थिनीसाठी केरळ सरकारने चालवली ७० आसनी ‘स्पेशल बोट’, कारण...

५.२ किमी प्रति सेकंद वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतंय नवं संकट; नासानं जारी केला अलर्ट

 

 

 

Web Title: Cyclone Nisarga: MNS leader Amit Thackeray gives 'valuable advice' to people pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.