Indian Navy rescue operation of ONGC workers: तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या बार्जवरील ओएनजीसीच्या 276 कामगारांपैकी 184 जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. आज हे कर्मचारी मुंबईच्या किनाऱ्यावर सुखरुप पोहोचले असून 11 तास समुद्राच्या पाण्यात लाईफ जॅकेटवर तरंगत होतो, नौदलाने वाचविले नाहीतर कोणीत जिवंत राहिला नसता, अशी प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. (Maharashtra: Crew rescued by Indian Navy from Barge P305 off the coast of Mumbai, walks out of INS Kochi after arriving in Mumbai)
Cyclone Tauktae: थरारक Video! आतापर्यंत समुद्रात अडकलेल्य़ा 177 कर्मचाऱ्यांची सुटका; इतरांचा शोध सुरु
तौक्ते चक्रीवादळात हीरा ऑईल फिल़्डजवळ ओएनजीसीसाठी काम करणाऱ्या कंत्राटदाराची बार्ज Barge P305 बुडाली होती. यावरील 184 जणांना वाचविण्यात आले आहे. आम्ही आताच आयएनएस कोचीवरून 125 जणांना आणल्याचे जहाजाचे कॅप्टन सचिन सिकेरिया यांनी सांगितले. समुद्रातील परिस्थिती आता निवळत आहे. अद्याप काही जणांचा शोध सुरु आहे. आम्ही अजून आशा सोडलेली नाही. आम्ही वाईट घटना मागे सोडून आलो असू असे वाटते, असे ते म्हणाले. (total of 184 people have been rescued so far, search and rescue operations are still going on.)
एएनआयने एका कामगाराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये हा कामगार रडताना दिसत आहे. ''नौदलाच्या जवानांचे खूप खूप धन्यवाद! त्यांच्यामुळे आम्ही आज जिवंत आहोत. नाहीतर कोणीही वाचले नसते. आमच्यासारखीच इतरांची स्थिती आहे.'', असे तो म्हणत होता.
याच बार्जवर असलेल्या अमित कुमार यांनी आमचे बार्ज बुडत होते. यामुळे मी उधाणलेल्या समुद्रात उडी मारली. मी जवळपास 11 तास समुद्राच्या पाण्यावर तरंगत होतो. शेवटी आम्हाला नौदलाने वाचविले, असे सांगितले.
दरम्यान, नौदलाने अरबी समुद्रात आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मोठमोठ्या युद्धनौकांसोबत आयएनएस तेज. आयएनएस बेतवा, आयएनएस बीस आदी युद्धनौका आणि विमाने शोधकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. अद्याप 89 कामगार बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. आता वाचविण्यात आलेल्या लोकांकडे लाईफ जॅकेट होती. यामुळे या बेपत्ता लोकांकडे देखील लाईफ जॅकेट असतील अशी आशा नौदलाला आहे. यामुळे हे कामगार तरंगत असले तर आपल्याला वाचविता येतील. यामुळे नौदलाने अद्याप आशा सोडलेली नाही.