Cyclone Tauktae: मोठी बातमी! नौदलाला आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह सापडले; तौक्ते चक्रीवादळात ONGC चा बार्ज बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 01:11 PM2021-05-19T13:11:34+5:302021-05-19T13:47:01+5:30

Cyclone Tauktae ONGC Barge sinking; 14 dead body recovered by Navy: तौक्ते चक्रीवादळात ( Cyclone Tauktae) हीरा ऑईल फिल़्डजवळ ओएनजीसीसाठी काम करणाऱ्या कंत्राटदाराची बार्ज  Barge P305 बुडाली होती. यावरील 184 जणांना वाचविण्यात आले आहे.

Cyclone Tauktae: Indian Navy has recovered 14 dead bodies so far; ONGC Barge P305 sank off | Cyclone Tauktae: मोठी बातमी! नौदलाला आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह सापडले; तौक्ते चक्रीवादळात ONGC चा बार्ज बुडाला

Cyclone Tauktae: मोठी बातमी! नौदलाला आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह सापडले; तौक्ते चक्रीवादळात ONGC चा बार्ज बुडाला

Next

ONGC 14 worker Dead in Cyclone Tauktae mishap:  तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या बार्जवरील ओएनजीसीच्या (ONGC) 276 कामगारांपैकी 184 जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. मात्र, बार्ज बुडाल्याने बेपत्ता असलेल्या 89 पैकी 14 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. तौक्तेने आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. आता उर्वरित 75 जणांची शोध मोहिम नौदलाने तीव्र केली आहे. (14 dead bodies have been recovered from the Arabian Sea after Barge P305 sank off Mumbai coast. 184 people rescued so far. Search and rescue operations are underway)


Cyclone Tauktae: 11 तास समुद्राच्या पाण्यात, नौदलामुळे आम्ही जिवंत!; ONGC कामगार ढसाढसा रडला

Tauktae Mumbai Navy Rescue News: नौदलाने वाचविलेले 184 जण नुकतेच मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले आहेत. त्यांनी भर समुद्रात चाललेला मृत्यूचा तांडव सांगितला आहे. 11 तास लाईफ जॅकेटवर उधानलेल्या समुद्रात तरंगत होते. नौदलाने बचाव कार्यावेळी या साऱ्यांना वाचविले.




तौक्ते चक्रीवादळात ( Cyclone Tauktae) हीरा ऑईल फिल़्डजवळ ओएनजीसीसाठी काम करणाऱ्या कंत्राटदाराची बार्ज  Barge P305 बुडाली होती. यावरील 184 जणांना वाचविण्यात आले आहे. आम्ही आताच आयएनएस कोचीवरून 125 जणांना आणल्याचे जहाजाचे कॅप्टन सचिन सिकेरिया यांनी सांगितले. समुद्रातील परिस्थिती आता निवळत आहे. अद्याप काही जणांचा शोध सुरु आहे. आम्ही अजून आशा सोडलेली नाही. आम्ही वाईट घटना मागे सोडून आलो असू असे वाटते, असे ते म्हणाले. 
यानंतर काही वेळातच समुद्रात 14 कामगारांचे मृतदेह सापडल्याचे वृत्त आले आहे. काळजाचा ठोका चुकविणारी ही घटना आहे. बार्ज  Barge P305 वर एकूण 276 कामगार होते, असे सांगितले जात आहे. यामुळे उर्वरित कामगार लाईफ जॅकेटच्या मदतीने सुखरुप असतील अशी आशा केली जात आहे. 


नौदलाने आशा सोडलेली नाहीय...
रम्यान, नौदलाने अरबी समुद्रात आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मोठमोठ्या युद्धनौकांसोबत आयएनएस तेज. आयएनएस बेतवा, आयएनएस बीस आदी युद्धनौका आणि विमाने शोधकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. अद्याप 89 कामगार बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. आता वाचविण्यात आलेल्या लोकांकडे लाईफ जॅकेट होती. यामुळे या बेपत्ता लोकांकडे देखील लाईफ जॅकेट असतील अशी आशा नौदलाला आहे. यामुळे हे कामगार तरंगत असले तर आपल्याला वाचविता येतील. यामुळे नौदलाने अद्याप आशा सोडलेली नाही. 

Read in English

Web Title: Cyclone Tauktae: Indian Navy has recovered 14 dead bodies so far; ONGC Barge P305 sank off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.