Cyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 05:45 PM2021-05-16T17:45:38+5:302021-05-16T17:46:24+5:30

Cyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे.

Cyclone Tauktae Live Updates heavy rains in kokan will hit mumbai also | Cyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस

Cyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस

googlenewsNext

Cyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. राजापूर, रत्नागिरीच्या किनारपट्टीभागात सोसाट्याचा वारा सुरू असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तौत्के चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई जवळून प्रवास करत. त्यामुळे किनारपट्टीभागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Cyclone Tauktae Live Updates:

11.02 pm: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं; अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस

10.50 pm:  तौक्ते चक्रीवादळाचा धोका पाहात मुंबई विमानतळ बंद करण्यात आले होते. मात्र, आता रात्री १० वाजल्यापासून विमानतळावरून विमानांचे उड्डाण सुरू करण्यात आले आहे.

10.31 pm: चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ५५ हून अधिक विमानांचे उड्डाण मुंबई विमान तळावरून रद्द करण्यात आले आहे.  

09.26 pm: डोंबिवलीमध्ये पाऊस थांबला असून वादळ वारे शमले आहेत, काही भागात अद्यापही वीज खंडित असून महावितरणचे काम सुरू आहे

09.24 pm: तौक्ते चक्रीवादळाचं केंद्र सौराष्ट्र किनाऱ्यापासून दिवच्या दिशेनं पुढील ३ तासांत सरकणार

08. 36pm : तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना

08.06pm : मुंबईत 24 तासात अतिवृष्टीची शक्यता, 120 किमी वेगाने वारे वाहणार

08.03pm : ठाण्यात दिवसभरात १६२.९३ मीमी पावसाची नोंद

ठाणे : चक्रीवादळाचा फटका ठाण्यालाही बसल्याचे दिसून आले आहे. शहरात रात्रीपासून वाऱ्यासह पावसाला दमदार सुरवात झाली. सोमवारी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहराच्या विविध भागात 59 वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. यामध्ये काही वाहनांसह घरांचेही नुकसान झाले. तर काही ठिकाणी वृक्षाच्या फांद्यादेखील पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात जीवतहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.

07.45pm : ठाण्यात अनेक ठिकाणी पावसामुळे पडझड, जनजीवन विस्कळीत

07.15pm : वृक्ष कारवर पडला, गाडीतून एकाची सुखरुप सुटका
ठाणे  - दिवसभर सुरु असलेल्या पावसात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याचे दिसून आले. तर सांयकाळी नौपाडा पोलीस स्टेशन जवळ एका कारवर वृक्ष पडल्याची घटना घडली. यावेळी कारमध्ये वाहन चालकही होते. परंतु अचानक वृक्ष कारवर पडल्याने रोहीत गायकवाड हे देखील त्या कारमध्ये अडकून पडले. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच ठाणो महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि टीडीआरएफ, अग्निशमन विभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना कारमधून बाहेर काढले. यात त्यांना काहीसा मार लागल्याने त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

06. 50pm : भिवंडीत वादळी वाऱ्यामुळे पाण्याच्या टाकीच्या शिडीचा भाग तुटला; वेळोवेळी तक्रार करूनही मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा नगरसेवकाचा आरोप 

06.06pm : ठाणे : नौपाडा, ब्राह्मण सोसायटी येथे द्वारका इमारतीत असलेले मोठे झाड कोसळले आहे. झाड पडल्याने इमारतीच्या संरक्षक भितींचा काही भाग पडला आहे. तसेच झाड मोठे असल्याने समोरील बिवलकर इमारत आणि रामदास निवास इमारत येथे पडल्याने तेथे काहीसे नुकसान झाले आहे. झाड एका गाडीवर पडले आहे. गाडीचे नुकसान देखील झाले आहे.

 

06.00 pm: चक्रीवादळामुळे सकाळपासून मुंबईत जोरदार वारे वाहत असून तसेच मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे घाटकोपर येथील पंतनगरच्या आर.एन. नारकर मार्गावरील महाकाय वृक्ष उन्मळून पडले आहे. तसेच घाटकोपर बस डेपो जवळील लक्ष्मीबाग नाला तुडुंब भरून वाहत असून नाल्याकाठावरील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन सद्यस्थिती जाणून घेतली. संबंधित कोसळलेले वृक्ष तात्काळ हटविण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

05.53 pm: पनवेलमध्ये हवेचा जोर वाढल्यामुळे टपाल नाका सबस्टेशन बंद केले आहे. वाऱ्याचा जोर कमी होताच वीजपुरवठा सुरु केला जाईल अशी माहिती महावितरणने दिली आहे.

05.19 pm: दहिसरजवळ रेल्वे रुळावर वादळानं उडून आलेला पत्रा कोसळला, रेल्वे सेवा काही काळ ठप्प झाली होती<

blockquote class="twitter-tweet">

VIDEO: दहिसरजवळ तौत्के चक्रीवादळामुळे उडालेला एक पत्रा रेल्वे रुळावर आल्यानं रेल्वे सेवा काही थांबली होती. मोटरमननं अडथळा दूर केल्यानंतर सेवा पूर्ववत#TauktaeCyclonepic.twitter.com/muMij7MD96

— Lokmat (@MiLOKMAT) May 17, 2021

04.54 pm: बीकेसी कोविड सेंटरला चक्रीवादळामुळे नुकसान नाही, प्रशासनाच्या पूर्वतयारीला यश

04.17 pm: मुंब्र्यातील शंकर मंदिर परीसरातील फातिमा या इमारतीच्या टेरेसच्या संरक्षक भिंतिचा काही भाग शेजारच्या चाळीतील घरावर कोसळला.यामध्ये घरातील तीन जण जखमी झाले आहेत.

04.11 pm: रायगड : जिल्ह्यातील एकूण 69 कोविड रुग्णालयांपैकी 31 रुग्णालये थेट वीजपुरवठयाद्वारे सुरु असून 38 कोविड रुग्णालये जनरेटर बॅकअपवर सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

०3.55 pm: रायगड जिल्ह्यात 1200 घरांचे नुकसान करून तौक्ते वादळ गुजरातकडे सरकले, वादळी वारे आणि पावसाचा जोर मात्र कायम

03.10PM - मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात, मस्जिद स्टेशन जवळ पाणी भरल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हार्बर लाइनची वाहतूक सीएसएमटी ते वडाळा स्टेशनदरम्यान दुपारी १.२० वाजलेपासून बंद केली आहे. बाकी सर्व ठिकाणी वाहतूक सुरू आहे.

02.25Pm - मीरारोड - भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छीमार बोट अजूनही समुद्रातच अडकली आहे. या बोटीवर जस्टीन मिरांडा ह्या नाखवासह 5 खलाशी, असे 6 जण आहेत. वादळाच्या तडाख्यात ही बोट सापडली असून सध्या मदतकार्यही अशक्य होऊन बसले आहे.

01.30 PM - कल्याण डोंबिवलीत गेल्या अर्ध्या तासापासून सोसाट्याचा वारा, अनेक ठिकाणी झाडांची पडझड, काही घरांवरील पत्रेही उडाले.

01.10Pm - 'तौत्के' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, या अनुषंगाने महानगरपालिकेने केलेल्या विविध नियोजनाच्या अंमलबजावणीचाही आढावाही त्यांनी घेतला.



 

01.03Pm - पनवेल परिसरात तोक्ते वादळाचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. पहाटेपासून तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली, वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष कोलमडून पडले, शहरी भागात ईमारतीच्या टेरेसवरील पत्रेही हवेने उडाली असल्याचे पाहावयास मिळत आहेत. पालिका प्रशासन व महसुल प्रशासन नुकसानग्रस्त ठिकाणाचा आढावा घेत आहेत.

12.58Pm - पालघर - नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच कच्च्या घरात असल्यास नजीकच्या जिल्हा प्रशासनाने व्यावस्था केलेल्या नजीकच्या शाळेत आश्रय घ्यावा, विजेच्या खांबापासून व झाडांपासून नागरिकांनी दूर रहावे - जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे नागरिकांना आवाहन.

12.50Pm - चक्रीवादळ आज रात्री आठ ते अकरा दरम्यान गुजरातला धडकणार, शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग यांची माहिती



 

12.35Pm - मुंबईत पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग प्रचंड आहे...

12.29Pm - उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर प्रचंड वारा आणि पाऊस, लाटाचा मारा वाढला..




12.13Am - बीकेसीतील कोविड सेंटरला वादळाचा फटका, जोरदार वाऱ्यामुळे कोविड सेंटरचे पत्रे उडाले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

12.12Pm - मीरारोड - भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील पाली चर्च चे पत्र वादळाने उडाले.



 

12.04 - तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव नाशिकातही, सकाळपासून आतापर्यंत शहरात 1.8मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद.

11.54AM - तौक्ते चक्रीवादळ व पाऊस या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज गेट वे ऑफ इंडियापासून चौपाटीच्या पाहणीला प्रारंभ केला. बृहन्मुंबई महापालिकेने चौपाट्यांवर केलेल्या तयारी कामांचा आढावा त्यांनी घेतला.

11.46Am - पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यातील काही घरांची पडझड झाली आहे.वारा आणि पावसाचा जोर ओसरला आहे.

11.27Am - तौत्के चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर  जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस, असे चित्र दिसत आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण 2 हजार 263 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

11.04Am - "तौत्के" चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण, आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती.

10.39Am - पालघर - समुद्रातून चक्रीवादळाचे गुजरातच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाचे पडसाद जिल्ह्यातील किनारपट्टी भागात दिसू लागले आहेत. जिल्ह्यात 3 ठिकाणी घराची पत्रे, एका शाळेचे किरकोळ नुकसान झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

10.16Am - अलिबागमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस.


9.47Am - चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व केंद्रावरील लसीकरण आज बंद राहणार.

9.44 - वादळाचा मध्य रेल्वेला फटका, झाड पडल्याने सीएसटीकडून ठाण्याकडे जाणारी धीम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद, सर्व रेल्वे गाड्या जलद मार्गावरून वळवल्या.




9.29 - शहरातील विविध भागात १३ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. 

7.35 Am - रायगडात चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ८३६० लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. पोलादपूर, महाड, रोहा याठिकाणी १७ विजेचे खांब कोसळले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे १२ झाडं कोलमडली. 

11.05 pm: मुंबईत तौत्के चक्रीवादळामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

10.49 pm: रत्नागिरी व राजापूर तालुक्याच्या जवळून गेल्यानंतर चक्रीवादळ पुन्हा एकदा समुद्रात आतील बाजूस सरकले आहे व त्याची उत्तरेकडची वाटचाल सुरू झाली आहे. 

10.46 pm: रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील ६ हजार ५०० पेक्षाही अधिक नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर; प्रशासनाची खबरदारी 

10.42 pm: विरार, नालासोपारा येथे सोसाट्याचा वारा; नालासोपाऱ्यात वीज पुरवठा खंडीत

10.31 pm: तौत्के चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टीपासून २२० किमी दूर  

9.20 pm: रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण

8.11 pm: रायगड किनारपट्टीला आज मध्यरात्री चक्रीवादळ धडकणार, प्रशासन लागलं कामाला, नागरिकांचं स्थलांतर सुरू 

7.41 pm: तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागातर्फे विविध ठिकाणी वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विद्युत पुरवठा विभागातर्फे नियंत्रण कक्षांमध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक अधिकांशाने करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक आणि विद्युत पुरवठा विभागातर्फे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षांमध्ये देखील उपक्रमाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

7.15 pm: ठाण्यात सोसाट्याचा वारा आणि रिमझिम पाऊस

7.00 pm: महाड नगरपालिका हद्दीतील दादळी पूल येथील 9 आदिवासी कुटुंब नगरपालिका शाळेत स्थलांतरित केले.

6.58 pm: आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील 2254 नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे

5. 33 pm: रायगड जिल्ह्यातील 1596 नारीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे

5. 14 pm: धुळे शहरासह जिल्ह्यातही रविवारी अनेक ठिकाणी पावसाने वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली

4.39 pm: मुरूड, नांदगाव, बोरली, कोली, राजापूर या ठिकाणी कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.

4.22 pm: राजापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात

4.05 pm: अमळनेर येथे जोरदार वादळामुळे खळ्यात असलेले झाड झोपडीवर कोसळले. या झोपडीखाली दाबले जाऊन दोन बहिणी ठार झाल्याची दुर्देवी घटना  

3.56 pm : रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे येथील घरावरचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेले.

Web Title: Cyclone Tauktae Live Updates heavy rains in kokan will hit mumbai also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.