ONGC 26 worker Dead in Cyclone Tauktae mishap: मुंबई : तौक्ते चक्रीवादळात ( Cyclone Tauktae) हीरा ऑईल फिल़्डजवळ ओएनजीसीसाठी (ONGC) काम करणाऱ्या कंत्राटदाराची बार्ज Barge P305 बुडाली होती. यामध्ये बेपत्ता असलेल्या 75 कामगारांपैकी आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामगारांचे मृतदेह नौदलाला सापडले आहेत. या कामगारांचे मृतदेह 50 ते 60 नॉटिकल मैल म्हणजेच 90 किमीपेक्षा जास्त परिसरात तरंगताना सापडले आहेत. बार्ज पी305 वरील 38 क्रू मेंबर अद्याप बेपत्ता आहेत. 186 लोकांना वाचविण्यात आले आहे. (26 dead bodies have been recovered so far from the Arabian Sea after Barge P305 sank off Mumbai coast by Indian Navy.)
Cyclone Tauktae: 11 तास समुद्राच्या पाण्यात, नौदलामुळे आम्ही जिवंत!; ONGC कामगार ढसाढसा रडला38 कामगार अद्यापही बेपत्तासुरुवातीला बार्जवर 273 लोक होते अशी माहिती समोर आली होती. परंतू ONGC ने या बार्जवर 261 कामगार होते, असे नंतर स्पष्ट केले आहे. अधिकाऱ्यांनुसार बेपत्ता असलेल्या 38 लोकांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरुच राहणार आहे. ओएनजीसीची जहाजे चक्रीवादळात कशी काय अडकली याची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रालयाने तीन सदस्यांची समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.
Super Cyclone Yaas: तौक्ते पाठोपाठ दुसरे Yaas चक्रीवादळ धडकणार; बंगाल उपसागराचे तापमान वाढले
चक्रीवादळात चार जहाजे अडकलेलीसुरुवातीला एक नंतर तीन जहाज अडकल्याची माहिती येत होती. मात्र, आता चार जहाजे अडकल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई किनाऱ्याजवळ दोन बार्ज, गुजरातच्या पिपावाव बंदराजवळ एक बार्ज आणि एक ड्रिलशिप होते. सुरुवातीला एकच बार्ज बुडत असल्याची माहिती नौदलाला मिळाली होत. यामुळे नौदलाने दोन युद्धनौका शोधकार्यासाठी पाठविल्या होत्या. मात्र, याची व्याप्ती पाहून आणखी तीन युद्धनौका आणि विमानांसह मोठी ताकद नौदलाने बचावकार्यासाठी लावली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत नौदलाने 638 लोकांना वाचविले आहे. आता जे सापडले नाहीत, त्यांचा शोध घेतला जात आहे.