मुंबई - तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. सोमवारी समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या होत्या. सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. त्यामुळे गोवा किनारपट्टीपासून 150 किमी आतमध्ये चक्रीवादळला (Cyclone in Arabian Sea) सुरूवात झाली आहे. याचा मोठा फटका भारताच्या पश्चिम किनारपट्टीला बसला आहे. या वादळाला अनुसरुन अमृता फडणवीस यांनी शायरी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी शायरीतून सवाल केलाय.
महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत असताना आता तौत्के चक्रीवादळाच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकार खंबीरपणे या संकाटलाही तोंड देत आहे. मुंबईत मुसळधार पाऊस (Rain in Mumbai) कोसळत असून अनेक ठिकाणी झाडं, विजेचे खांब कोसळले आहेत. तर काही ठिकाणी रस्तेही तुंबले आहेत. तौत्क चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई जवळून प्रवास करणार आहे. त्यामुळे किनारपट्टीभागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे चक्रीवादळ या संकटातही सोशल मीडियावर हशा पिकवणाऱ्यांची कमी नसते. सोशल मीडियावर तौत्के चक्रीवादाळावरुन जोक्स व मिम्स व्हायरल होत आहेत. अमृता फडणवीस यांनीही शायरीतून चक्रावादळाचं वर्णन करताना, प्रश्न विचारला होता. अमृता फडणवीस यांच्या या शायरीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही शायरीतूनच उत्तर दिलंय.
तुफाँ तो इस शहर में अक्सर आता है,देखें अबके किसका नंबर आता है !, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. त्यावर, रुपाली चाकणकर यांनीही शायरीतूनच उत्तर दिलंय.
तुफां तो इस शहर ने अक्सर झेला हैमहाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !!, असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलंय.
उन्मेश पाटील यांचेही मजेशीर ट्विट
जळगावचे भाजपा खासदार उन्मेश पाटील यांनीही एक ट्विट करुन हशा पिकवला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोलाही लगावलाय. चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डावसंजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार, असे मजेशीर ट्विट पाटील यांनी केलंय