डी. एन. नगर ते मानखुर्द मेट्रोचे नष्टचर्य संपणार , मार्गातील अडथळा दूर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 04:04 AM2020-09-01T04:04:20+5:302020-09-01T04:05:21+5:30

कंत्राटदाराच्या हलगर्जी कारभारामुळे रखडलेल्या डी. एन. नगर ते मानखूर्द या मार्गावरील मेट्रो दोन बच्या कामात मोठे विघ्न निर्माण झाले होते.

D. N. The destruction of Nagar to Mankhurd Metro will end and the obstruction on the route will be removed | डी. एन. नगर ते मानखुर्द मेट्रोचे नष्टचर्य संपणार , मार्गातील अडथळा दूर होणार

डी. एन. नगर ते मानखुर्द मेट्रोचे नष्टचर्य संपणार , मार्गातील अडथळा दूर होणार

Next

मुंबई : कंत्राटदाराच्या हलगर्जी कारभारामुळे रखडलेल्या डी. एन. नगर ते मानखूर्द या मार्गावरील मेट्रो दोन बच्या कामात मोठे विघ्न निर्माण झाले होते. या कामांसाठी नव्याने काढलेल्या निविदांचे गणितही मार्गिकेवरील तीन आयकाँनीक पुलांनी पुन्हा बिघडविले. त्यामुळे या कामाची आणखी रखडपट्टी सुरू होती.
मात्र, आता या तीन पुलांचा समावेश मेट्रो मार्गिकांच्या कामांमध्येच करून त्यांना चालना देण्याचा प्रयत्न एमएमआरडीएने सुरू केला आहे. मेट्रो दोन ब या मार्गिकेच्या तीन टप्प्यातल्या कामात दिरंगाई करणा-या कंत्राटदारांना एमएमआरडीएने फेब्रुवारी महिन्यांत बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर रखडलेले ९३ टक्के काम मार्गी लावण्यासाठी नवा कंत्राटदार नियुक्तीचे प्रयत्न सुरू
होते.
सहा महिन्यांच्या प्रयत्नानंतर या कामांसाठी निविदा प्राप्त झाल्या. मात्र, त्यानंतर या मार्गिकेवरील तीन आयकाँनीक पुलांचा समावेश करूनच काम करणे आवश्यक असल्याची उपरती एमएमआरडीएला झाली. त्यामुळे अंतिम टप्प्यात अससेल्या तीन पैकी दोन निविदा पुन्हा रद्द करण्यात आल्या आहेत. आता एक महिन्यानंतर या कामांसाठी एमएमआरडीएने नव्याने निविदा प्रसिध्द केल्या आहेत.
तीन पँकेजमध्ये या रखडलेल्या कामांची पूर्तता केली जाणार असून त्यापैकी दोन पँकेजमध्येच सुमारे १८१ कोटी रुपये खर्च असलेल्या वाकोला नाला, कलानगर आणि मिठी नदी या तीन ठिकाणच्या ‘केबल ब्रिज’चा अर्थात आयकाँनीक पुलांचाही समावेश करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता आयकाँनीक पुलांच्या कामासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्याची गरज नाही. तसेच, कामाच्या स्वरुपात केलेल्या बदलांमुळे खर्चात वाढ झाली नसल्याचा दावाही अधिका-यांकडून करण्यात आला आहे.

मेट्रो एक-दीड वर्ष उशिराने धावणार
आँक्टोबर, २०२२ पासून ही मार्गिका कार्यान्वीत करण्याचे नियोजन होते. मात्र, जेमतेम सात टक्के काम झाले आहे. उर्वरित ९३ टक्के कामासाठी किमान ३० महिन्यांचा कालावधी लागेल असे एमएमआरडीचे म्हणणे आहे. निविदा प्रक्रिया निर्विघ्न पार पडली तरी प्रत्यक्ष कार्यादेश देण्यास जानेवारी, २०२१ उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काम पूर्ण करण्यात निर्धारित वेळेपेक्षा किमान एक ते दीड वर्ष विलंब होण्याची चिन्हे आहेत.

दोन हजार कोटींचा खर्च
डी एन नगर ते एमटीएनएलपर्यंतच्या सी -१०१ या पहिल्या पँकेजसाठी १०५८.७१ कोटी, एमटीएनएल ते डायमंड गार्डन, चेंबुरपर्यंतच्या सी -१०२ या पँकेजसाठी ४७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. या दोन्ही पँकेजमध्ये आयकाँनीक पुलांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन कामांसाठी फेरिनिविदा काढण्यात आल्या आहेत. त्याशिवाय मानखुर्द डेपोच्या बांधकामालाछी ४६४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून ती निविदा अंतिम टप्प्यावर आहे़

Web Title: D. N. The destruction of Nagar to Mankhurd Metro will end and the obstruction on the route will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.