डबेवाल्यांची भाऊबीज भेट

By admin | Published: November 11, 2015 01:00 AM2015-11-11T01:00:55+5:302015-11-11T01:00:55+5:30

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना विविध स्तरांतून मदत होत असताना मुंबईच्या डबेवाल्यांनीही पुढाकार घेतला आहे. यंदाच्या दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळीची भेट घेऊन मुंबईचे डबेवाले मराठवाड्याला जाणार आहेत.

Dabewala's brother-in-law visit | डबेवाल्यांची भाऊबीज भेट

डबेवाल्यांची भाऊबीज भेट

Next

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना विविध स्तरांतून मदत होत असताना मुंबईच्या डबेवाल्यांनीही पुढाकार घेतला आहे. यंदाच्या दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळीची भेट घेऊन मुंबईचे डबेवाले मराठवाड्याला जाणार आहेत.
धनत्रयोदशीच्या दिवशी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना डबेवाले भेटणार आहेत. या वेळी या कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ आणि भगिनींसाठी भाऊबीजेची भेट म्हणून साडीही देण्यात येणार आहे. या मदतीदरम्यान ५०० साड्या आणि ५०० दिवाळी फराळाच्या पाकिटांचे वितरण करण्यात येणार आहे.
विशेषत: मुंबईच्या डबेवाल्यांनी मु.पो. करमळ ता. जि. औरंगाबाद या गावाचा परिसरा निवडला आहे. या मदतकार्यात डबेवाल्यांच्या वतीने डबेवाले संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे, सुभाष तळेकर, विठ्ठल सावंत, दशरथ केदारी, विलास महाराज शिंदे सहभागी झाले आहेत. तसेच दीपक चौधरी आणि डॉ. पवन अग्रवाल यांनी विशेष सहकार्य केले आहे. (प्रतिनिधी)
दिवाळीनिमित्त शाळा आणि कार्यालयांना असणाऱ्या रजेमुळे मुंबईचे डबेवालेही आता दिवाळीच्या सुटीवर आहेत. या दिवाळीत डबेवाले बांधव १४ नोव्हेंबरपर्यंत सुटीवर आहेत.
धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज यानिमित्त अनेक शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये बंद आहेत. म्हणून डबेवाल्या बांधवांनी मुंबईत व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी, १६ नोव्हेंबरपासून डबेवाले बांधव आपल्या कामावर हजर होतील.

Web Title: Dabewala's brother-in-law visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.