Join us  

डबेवाले ‘आॅनलाइन’

By admin | Published: July 24, 2015 2:19 AM

गेल्या १२५हून अधिक वर्षांपासून मुंबईकरांना डबा पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनी आता अपडेट होण्याचे ठरविले आहे. डबेवाल्यांचे ‘डबेवाले डॉट कॉम’

मुंबई : गेल्या १२५हून अधिक वर्षांपासून मुंबईकरांना डबा पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनी आता अपडेट होण्याचे ठरविले आहे. डबेवाल्यांचे ‘डबेवाले डॉट कॉम’ हे संकेतस्थळ लवकरच सुरू होणार आहे. आॅनलाइन विश्वातील प्रवेशाने आता डबेवाल्यांची सेवा घेणे अधिक सुलभ होणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून डबेवाले पारंपरिक पद्धतीने डबे पोहोचविण्याचे काम करतात. पण काळाची गरज लक्षात घेऊन आता डबेवाल्यांनीही अपडेट होण्याचे ठरविले आहे. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच हे संकेतस्थळ दाखल होणार आहे. येत्या आषाढी एकादशीला, २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन होणार आहे. आॅनलाइनचे विश्व डबेवाल्यांसाठी नवीन आहे. तेव्हा कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे सरचिटणीस सुभाष तळेकर म्हणाले की, मी स्वत: पदवीधर असल्याचे थोडेफार आॅनलाइनचे ज्ञान आहे. आम्ही या माध्यमाचा वापरही सेवा देण्यासाठी करणार आहोत. हा प्रयोग यशस्वी झाला, तर डबेवाल्यांचीही व्यवसायात प्रगती होईल. मुंबई : गेल्या १२५हून अधिक वर्षांपासून मुंबईकरांना डबा पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनी आता अपडेट होण्याचे ठरविले आहे. डबेवाल्यांचे ‘डबेवाले डॉट कॉम’ हे संकेतस्थळ लवकरच सुरू होणार आहे. आॅनलाइन विश्वातील प्रवेशाने आता डबेवाल्यांची सेवा घेणे अधिक सुलभ होणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून डबेवाले पारंपरिक पद्धतीने डबे पोहोचविण्याचे काम करतात. पण काळाची गरज लक्षात घेऊन आता डबेवाल्यांनीही अपडेट होण्याचे ठरविले आहे. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच हे संकेतस्थळ दाखल होणार आहे. येत्या आषाढी एकादशीला, २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन होणार आहे. आॅनलाइनचे विश्व डबेवाल्यांसाठी नवीन आहे. तेव्हा कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे सरचिटणीस सुभाष तळेकर म्हणाले की, मी स्वत: पदवीधर असल्याचे थोडेफार आॅनलाइनचे ज्ञान आहे. आम्ही या माध्यमाचा वापरही सेवा देण्यासाठी करणार आहोत. हा प्रयोग यशस्वी झाला, तर डबेवाल्यांचीही व्यवसायात प्रगती होईल. (प्रतिनिधी)(प्रतिनिधी)