दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी विक्रम भावेचा जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 05:57 AM2021-05-07T05:57:44+5:302021-05-07T05:58:16+5:30

सीबीआयचे वकील संदेश पाटील यांनी या आदेशाला स्थगितीची विनंती केली. परंतु, न्यायालयाने ती फेटाळली

Dabholkar murder case: Accused Vikram Bhave granted bail | दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी विक्रम भावेचा जामीन मंजूर

दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी विक्रम भावेचा जामीन मंजूर

Next

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपी असलेला विक्रम भावे याचा जामीन उच्च न्यायालयाने गुरुवारी मंजूर केला. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी सचिन अंदुरे व शरद कळस्कर यांनी बंदुकीची गोळी झाडून हत्या केली. विक्रम भावे याने रेकी करून या दोघांना मदत केली. तसेच त्यांना बाहेर पडण्याचा मार्गही दाखवला, असा आरोप पोलिसांनी भावेवर केला आहे. न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांनी भावे याचा जामीन मंजूर करत त्याला एक लाख रुपयांचा जातमुचलक्यावर साेडण्याचे आदेश दिले. त्याला पुणे पोलिसांत राेज हजेरी लावण्याचे, त्यापुढील दोन महिन्याच्या दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे, खटल्याला उपस्थित राहण्याचे तसेच, साक्षीदारावर दबाव न आणण्याचे, बेकायदा कृत्य न करण्याचे निर्देश दिले. 

सीबीआयचे वकील संदेश पाटील यांनी या आदेशाला स्थगितीची विनंती केली. परंतु, न्यायालयाने ती फेटाळली. कळस्करच्या जबाबानंतर सीबीआयने भावे, ॲड. संजीव पुनाळेकर यांना २५ मे २०१९ रोजी अटक केली. पुनाळेकर यांना पुण्याच्या सत्र न्यायालयाने जून २०१९ मध्येच जामीन दिला. मात्र, भावेचा जामीन पुणे न्यायालयाने नांमजूर केल्याने ताे  उच्च न्यायालयात गेला. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दाभोलकर यांची हत्या ज्या बंदुकीने केली ती नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेक यांनी कळस्करला दिला. पुनाळेकर यांचा मदतनीस भावेने घटनास्थळाची रेकी केली आणि आरोपींना पळण्याचा मार्गही दाखवला.
 

Web Title: Dabholkar murder case: Accused Vikram Bhave granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.