Join us

दाभोलकर हत्या प्रकरण: वीरेंद्र तावडे समाजासाठी धोकादायक; जामिनाला सीबीआयचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 12:42 PM

विचारधारा जुळत नसल्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी शार्प शूटरची व्यवस्था करण्याचे काम तावडे याने केल्याचा दावा सीबीआयने केला आहे. तावडे याने केलेल्या जामीन अर्जाला विरोध करताना सीबीआयने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.

मुंबई : सनातन संस्थेची श्रद्धा व परंपरेला विरोध करणाऱ्या व हिंदूंविरोधात असणाऱ्या लोकांची हत्या करणे, हेच उद्दिष्ट डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वीरेंद्र तावडे याचे होते, अशी माहिती सीबीआयने उच्च न्यायालयाला दिली.विचारधारा जुळत नसल्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी शार्प शूटरची व्यवस्था करण्याचे काम तावडे याने केल्याचा दावा सीबीआयने केला आहे. तावडे याने केलेल्या जामीन अर्जाला विरोध करताना सीबीआयने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.सीबीआयच्या म्हणण्यानुसार, तावडे आणि त्याचे सहकारी ‘क्षात्रधर्म साधना’चे पालन करीत. ज्या लोकांचे वर्तन आरोपी, सनातन संस्था / हिंदू जनजागृती समितीला आवडले किंवा सहन झाले नाही तर त्यांच्याशी क्रूर वर्तन करण्यात येईल, असाच संदेश दाभोलकरांच्या हत्येद्वारे देण्यात आल्याचे जाणवते.अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे दाभोलकर समाजातून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करीत होते. २० ऑगस्ट २०१३ रोजी दाभोलकर हे मॉर्निंग वॉक करत असताना बाईकस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. हेच आरोपी कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश हत्येतही सहभागी आहेत, असा दावा सीबीआयने केला आहे. 

टॅग्स :नरेंद्र दाभोलकरसनातन संस्थागुन्हा अन्वेषण विभाग