दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरला अटक, सीबीआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 06:24 AM2019-05-26T06:24:57+5:302019-05-26T06:25:09+5:30

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शनिवारी सनातन संस्थेची बाजू कोर्टात मांडणारा वकील संजीव पुनाळेकर व त्याचा सहकारी विक्रम भावे यांना मुंबईतून अटक केली.

Dabholkar's murder: Sanjeev Punalekar arrested, CBI's action | दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरला अटक, सीबीआयची कारवाई

दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरला अटक, सीबीआयची कारवाई

Next

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शनिवारी सनातन संस्थेची बाजू कोर्टात मांडणारा वकील संजीव पुनाळेकर व त्याचा सहकारी विक्रम भावे यांना मुंबईतून अटक केली. भावे हा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन बॉम्बस्फोटातील दोषी आहे. सध्या तो जामिनावर आहे. रविवारी दोघांनाही कोर्टात हजर केले जाईल.
दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात सहभागी होणे, पुरावे नष्ट करणे असे आरोप दोघांवर आहेत. पुनाळेकरवर मारेकऱ्यांना मार्गदर्शन केल्याचा आरोप आहे. मारेकऱ्यांना दाभोलकर कोण आहेत, हे दाखविण्याचे काम भावेने केल्याचा सीबीआयचा आरोप आहे.
नालासोपारा शस्त्रसाठ्याप्रकरणी शरद कळसकर व सचिन अंदुरे यांना एटीएसने केलेल्या अटकेनंतर यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुनाळेकर व भावेला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Dabholkar's murder: Sanjeev Punalekar arrested, CBI's action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.