वारे परिसरातील फार्महाउस मालकांची शेतकऱ्यावर दादागिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 04:59 AM2018-12-20T04:59:55+5:302018-12-20T05:00:17+5:30
रहदारीचा रस्ता केला बंद; वारे ग्रामपंचायतीने बजावली नोटीस
नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे येथील शेतकºयाचा त्यांच्या शेतावर जाण्यासाठी जो पूर्वीपासून रस्ता होता, तो रस्ता राज विद्या केंद्र फार्महाउस आणि राहुल फार्महाउस यांनी तारेचे कुंपण तसेच लोखंडी गेट लावून बंद केला आहे. त्यामुळे येथील शेतकºयाला त्याच्या शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. शेतकºयाने वारे ग्रामपंचायतीला सदर रस्ता खुला करण्याची मागणी केल्यानंतर ग्रामपंचायतीने सदर फार्महाउस मालकांना रस्ता खुला करण्याची नोटीस बजावली आहे; परंतु अनेक दिवस उलटूनही रस्ता खुला करण्यात आला नाही. एक प्रकारे येथे फार्महाउस मालकांची दादागिरीच सुरू असल्याचे चित्र आहे.
मागील काही वर्षांत कर्जत तालुक्यात फार्महाउस संस्कृती उदयास येत आहे. मात्र, हे उभारताना त्या भागातील स्थानिकांच्या तसेच शेतकºयांच्या वहिवाटीच्या जागा, रस्तेही अडविल्याचे निदर्शनास येत आहेत, तसेच कुंपणही घातले आहेत. असाच प्रकार वारे ग्रामपंचायत हद्दीतील वारे - कुरु ंग रस्त्यावर घडला आहे. वारे येथील शेतकरी अरविंद म्हसे यांच्या शेताकडे जाण्याचा रस्ता येथील फार्महाउस मालकांनी अडवला आहे. ही बाब अनेक वेळा फार्महाउस मालक तसेच ग्रामपंचायत यांच्या निदर्शनास आणूनही अद्याप रस्ता खुला करण्यात येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहे. याबाबत मागील अनेक दिवसांपासून संबंधित शेतकरी रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी करत आहे. तशी नोटीसही वारे ग्रामपंचायतीने सदर मालकाला दिली आहे, परंतु अद्याप रस्ता खुला करण्यात आलेला नाही.
त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
शेतकºयांच्या तक्र ारीची दखल घेण्यात आली असून त्या अनुषंगाने संबंधित फार्महाउस मालकांना रस्ता मोकळा करून द्यावा, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
- सुरेखा बांबले, ग्रामसेविका वारे ग्रामपंचायत
माझी या फार्महाउस पलीकडे शेती आहे. हा रस्ता अडविल्याने शेतीकडे जाण्यास एकमेव रस्ता असल्याने तो ही बंद केल्याने शेताकडे जाण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर खुला करण्यात यावा.
- अरविंद म्हसे, शेतकरी, वारे