दादर चौपाटी, वरळी किल्ल्याचे सुशोभीकरण; आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील प्रकल्पांना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 02:00 AM2020-02-06T02:00:07+5:302020-02-06T06:22:45+5:30

पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद

Dadar Chowpatty, Ornamental Fort Worli; Priority to projects in Aditya Thackeray's concept | दादर चौपाटी, वरळी किल्ल्याचे सुशोभीकरण; आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील प्रकल्पांना प्राधान्य

दादर चौपाटी, वरळी किल्ल्याचे सुशोभीकरण; आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील प्रकल्पांना प्राधान्य

Next

मुंबई : राज्य आणि महापालिका या दोन्ही ठिकाणी सत्ता असल्याने शिवसेनेच्या युवराजांच्या संकल्पनेतील काही प्रकल्प साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यावरण आणि पर्यटनमंत्री असलेले आदित्य ठाकरे यांनी सुचवलेल्या प्रकल्पांसाठी सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये दादर चौपाटी आणि वरळी किल्ल्याचे सुशोभीकरण, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे आमदारपदी निवडून आले. त्यानंतर त्यांनी नागरी कामांमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली. वरळी परिसरात कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकीतून (सीएसआर) माध्यमातून नागरी सेवा दिल्या जाणार आहेत. याअंतर्गत जी-दक्षिण विभागातील रस्ते आणि पदपथांवर झाडू मारणे, कचºयाचे वर्गीकरण करून ओला कचºयावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. सीएसआरच्या माध्यमातून नागरी कामे करून घेण्याचा हा पहिला प्रयोग आहे.

मुंबईत नाइटलाइफला परवानगी दिल्यानंतर महापालिकेत स्वतंत्र पर्यटन विभाग सुरू करण्याचा आदित्य ठाकरे यांचा मानस आहे. तसेच मुंबईतील काही प्रेक्षणीय स्थळांपैकी दादर चौपाटी सौंदर्यीकरणाकरिता चार कोटी, वरळी किल्ल्याचे सौंदर्यीकरण, रोषणाई करण्यात येणार आहे. ही रोषणाई वांद्रे वरळी सागरी सेतूवरूनही दिसू शकेल. नागरिकांना मज्जाव करण्यात आलेले तलाव परिसरही पर्यटनासाठी खुले केले जाणार आहेत.

तलाव परिसरात पर्यटन...

यावेळी अर्थसंकल्पात पर्यटनाला विशेष स्थान मिळाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांचे परिसर पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहेत. या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत थोडा महसूल जमा होईल, तानसा, मोडक सागर या तलावांच्या ठिकाणी गेस्ट हाऊसही आहेत. खासगी सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून या विश्रामगृहांची देखभाल प्रस्तावित आहे.

स्वतंत्र पर्यटन विभाग...

महापालिकेत स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा आदित्य ठाकरे यांचा मानस आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत ठाकरे यांची पालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठकही झाली होती. या विभागाच्या माध्यमातून पुरातन परिसराचे संवर्धन, चौपाट्यांचे सुशोभीकरण, जिजामाता उद्यानाचे नूतनीकरण या कामासाठी निधी पुरविण्यात येणार आहे.

Web Title: Dadar Chowpatty, Ornamental Fort Worli; Priority to projects in Aditya Thackeray's concept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.