लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जास्तीत जास्त लोकांची चाचणी, तत्काळ निदान आणि योग्य उपचार या उपाययोजनांचा प्रभाव पुन्हा एकदा जी उत्तर विभागात दिसून येत आहे. धारावी, दादर आणि माहीम या एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या भागांमध्ये आता एकूण ८५ सक्रिय रुग्ण उरले आहेत. त्यामुळे हा विभाग आता कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली. तरीही मुंबईतील इतर विभागांच्या तुलनेत धारावीमध्ये रुग्णवाढ कमी होती. दादर आणि माहीम परिसरात दररोज शंभरहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. त्यामुळे या परिसरात चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आले. दादर आणि माहीम परिसरातील दुकानदार, फेरीवाले व नागरिकांची चाचणी करण्यात आल्यामुळे तत्काळ निदान करून विलगीकरण करणे सुरू केले, तर धारावीत सर्वच नागरिकांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यामुळे या तिन्ही भागांमध्ये आता संसर्गाचे प्रमाण ०.०२ टक्के आहे. धारावीत आतापर्यंत ११ वेळा शून्य बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर सोमवारी धारावीमध्ये दोन आणि माहीम, दादरमध्ये प्रत्येकी एक कोरोनाबाधित आढळून आला आहे.
आजची रुग्णसंख्या
परिसर........सक्रिय....आतापर्यंत....डिस्चार्ज
दादर........३१....९९५२...९६४५
धारावी.......१०....६९९६...६५९६
माहीम.......४४...१०२६३....९९७३