धारावीपाठोपाठ दादर, माहीम नवा हॉटस्पॉट, आतापर्यंत ९७ कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 07:26 AM2020-04-16T07:26:47+5:302020-04-16T07:26:53+5:30

आतापर्यंत ९७ कोरोनाबाधित : उच्चभ्रू वस्तीतही वाढतेय लागण, मरकजमधील दोघांना संसर्ग

Dadar, the main nav hotspot behind Dharavi | धारावीपाठोपाठ दादर, माहीम नवा हॉटस्पॉट, आतापर्यंत ९७ कोरोनाबाधित

धारावीपाठोपाठ दादर, माहीम नवा हॉटस्पॉट, आतापर्यंत ९७ कोरोनाबाधित

Next




लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धारावी, दादर, माहीम या परिसरातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जी उत्तर विभाग चौथ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट बनला आहे. मरकज येथून आलेले दोघे जण कोरोनाबाधित असल्याचे उजेडात आले होते. त्यानंतर मंगळवारी धारावी येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा रुग्णही मरकजवरून आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या आता ९७ वर पोहोचली आहे.
धारावीमध्ये ६० रुग्ण सापडले असून, आठ जणांचे मृत्यू झाले आहेत. तर माहीम परिसरात बुधवारी तीन नवीन रुग्णांची नोंद होऊन एकूण संख्या नऊवर पोहोचली. दादर परिसरातही दोन नवीन रुग्ण सापडल्याने तिथे कोरोनाची लागण झालेले २१ रुग्ण आहेत. धारावीत बुधवारी मुकुंदनगरमधील ४७ आणि ३९ वर्षांच्या दोन महिला कोरोनाबाधित असल्याचे उघड झाले, तर २५, ३८ आणि २४ वर्षीय तीन रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
धारावीतील कोरोनाबाधित ५५ वर्षीय व्यक्तीला राजीव गांधी क्रीडा संकुलात ठेवले होते. त्याचा बुधवारी मृत्यू झाला. दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील दोन ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. माहीममध्ये ५५ वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. तर गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या माहीम येथील दुकानदाराच्या संपर्कातील ३८ वर्षांची महिला आणि ३२ वर्षांच्या पुरुषालाही कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनामुळे बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू
मुंबई : कोरोनाची लागण झालेला वडाळा बस आगारामधील विद्युत पुरवठा विभागातील कर्मचाºयाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. या कर्मचाºयाला २६ मार्च रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २ एप्रिलच्या चाचणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. - वृत्त/२
 

Web Title: Dadar, the main nav hotspot behind Dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.