Join us

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा युवा महोत्सव; शास्त्रीय गायनाची मैफिल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 3:51 PM

प्राजक्ता काकतकर आणि शिवानी मिरजकर यांच्या शास्त्रीय गायनाची मैफिल

मुंबई - दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत मधुकर मनमोहन आठल्ये आणि एस. एम. गोडबोले यांच्या स्मृतीप्रत्यर्थ आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवात शास्त्रीय संगीताची सुमधूर मैफिल रंगणार आहे. 

शनिवार २१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या गोखले सभागृहामध्ये हा महोत्सव होणार आहे. यानिमित्त प्राजक्ता काकतकर आणि शिवानी मिरजकर यांच्या शास्त्रीय गायनाचा सुमधूर कार्यक्रम सादर केला जाणार आहे. जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रतिमा टिळक यांच्या शिष्या प्राजक्ता यांनी संगीतामध्ये एम. ए. केले असून, त्या संगीत विशारद आहेत. त्यांना तबल्यावर प्रसाद काकतकर आणि संवादिनीवर अभिजीत काकतकर साथ करणार आहेत. शिवानी मिरजकर यांनी ग्वाल्हेरच्या किराणा घराण्याचे पं. चंद्रशेखर पुराणिकमठ, किराणा घराण्याचेच पं. कैवल्यकुमार गुरव आणि ग्वाल्हेर-जयपूर-आग्रा घराण्याचे पद्मश्री पं. उल्हास कशाळकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे. शिवानी यांनी संगीतात बी.ए., एम.ए. केले असून, सध्या त्या म्युझिकॅालॅाजीमध्ये पीएच.डी. करत आहेत. त्यांना तबल्यावर विनय मुंढे आणि संवादिनीची साथ अभिनय रवंदे करणार आहेत.

टॅग्स :मुंबई