दसऱ्यासाठी दादरचा फुल बाजार खरेदीदारांनी झाला हाऊसफुल्ल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2016 04:08 AM2016-10-11T04:08:53+5:302016-10-11T04:09:28+5:30
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत चाकरमान्यांनी फुलांच्या खरेदीसाठी दादर, भुलेश्वर, घाटकोपर, परळ, भायखळा, बोरिवली,
मुंबई : वाहतुकीचे नियम मोेडणाऱ्या वाहनचालकांना जरब बसावी यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंड आकारण्याच्या कारवाईला सहा दिवसांपूर्वी सुरुवात केली. त्यातून साडेचार हजाराहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सर्वाधिक कारवाई ही झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या असणाऱ्या वाहनांवर करण्यात आली आहे.
मुंबईत नुकतेच ४ हजार ७१७ सीसीटीव्ही बसवण्यात आले. या सीसीटीव्हींद्वारे वाहतूक नियमन करतानाच नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करणे सोपे जाईल, अशी आशा वाहतूक पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली.
एखाद्या वाहनचालकाने सिग्नल तोडल्यास, झेब्रा क्रॉसिंग ओलांडून उभे राहिल्यास किंवा बेदरकारपणे वाहन चालवल्यास ते वाहन सीसीटीव्हीत कैद होईल. त्याच वेळी नियंत्रण कक्षात असणाऱ्या आॅपरेटरला त्या वाहनाची नंबरप्लेटही सीसीटीव्हीत दिसेल आणि चालकाच्या मोबाइलवर दंडात्मक कारवाईचा एसएमएस करतानाच त्यात तारीख, वेळ व ठिकाणांचीही माहिती देण्यात येईल. त्यासाठी पुरावा म्हणून चालकाला नियम मोडल्याचा फोटो पाठविला जाणार आहे. त्याची सुरुवात ४ आॅक्टोबर रोजी केल्यानंतर साडेचार हजाराहून अधिक वाहन चालकांना दंडाची पावती पाठविण्यात आली आहेत. महत्त्वावे म्हणजे लाल सिग्नल असताना झेब्रा क्रॉसिंगवर किंवा त्यापुढे वाहने उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे दंडाची पावती अशाच ९0 टक्के वाहन चालकांना पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)