Join us

दादरची बाजारपेठ ‘फुल’ली, देश-विदेशातून आवक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 2:04 AM

शहरासह उपनगरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, दादर मार्केटमध्ये श्रींच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

- कुलदीप घायवट मुंबई : शहरासह उपनगरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, दादर मार्केटमध्ये श्रींच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यासह कर्नाटक, बंगळुरू येथून दादरच्या बाजारात फुले दाखल होत आहेत. तसेच थायलंड, हॉलंड, कोलंबिया येथून दाखल झालेली फुले ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत. दादर बाजारात मुंबईसह ठाणे, कल्याण, बदलापूर या ठिकाणाहून ग्राहक फुले खरेदीसाठी येत असून, यात उत्तरोत्तर भरच पडत आहे.दादर मार्केटमध्ये वसई, विरार, पालघर, पुणे, नाशिक, कासारवाडी, सांगली, सातारा, पंचवटी या ठिकाणाहून गुलाब, मोगरा, झेंडू, शेवंती, गुलछडी, जास्वंद, सोनचाफा या फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तर थायलंडवरून ब्लू आॅर्किड फ्लॉवर, हॉलंडवरून केळालिली, ट्युलिप, ट्युमा, रेड बेरीज, किंग खुसान, तुटींया, सिमस् फ्लॉवर, सिमस् कार्निमेशन फ्लॉवर, कोलंबियावरून हायटेन जेली या फुलांची आवक बाजारात वाढली आहे. दादर मार्केटमधील फुले अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता या ठिकाणी निर्यात केली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.दादर मार्केटमध्ये मंगळवारी झेंडूच्या ३० ट्रक (४ हजार किलो) फुलांची आवक झाली. शेवंती ९ ट्रक (१ हजार २०० किलो), २ टेम्पो गुलछडी, गोल्ड, जरभरा, गोल्डन या फुलांचे १ हजार बॉक्स बाजारात दाखल झाले आहेत. मार्केटचे संचालक दादाभाऊ गुलाब येणारे यांनी सांगितले की, एका दिवसाला बाजारात अंदाजे २ ते ३ कोटी रुपयांची उलाढाल सुरू आहे. अधिक मास असल्याने सण पुढे गेलेत. त्यामुळे फुलांच्या किमतीत फारशी वाढ झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.>दादर मार्केटचे उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी सांगितले की, दादर मध्यवर्ती ठिकाण असल्याने मोठ्या संख्येने साहित्य बाजारात दाखल होत आहे. राज्यासह कर्नाटक, बंगळुरू या ठिकाणांहून सर्व प्रकारची फुले बाजारात आली आहेत. सणासुदीच्या काळात फुलांच्या किमती १० ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.झेंडू ४० ते ६० रुपये किलोशेवंती ९० ते १०० रुपये किलोगुलछडी २०० ते ३०० रुपये किलोमोगरा ८०० ते १ हजार किलोगुलाब १०० रुपये जुडी (२० फुले)जास्वंद २० ते २५ रुपये (६ फुले)सोनचाफा २० ते २५ रुपये (६ फुले)ब्लू आॅर्किड ६०० रुपयेट्युलिप ८५० (१० फुले)ट्युमा १ हजार २०० जुडीकेळालीली २०० रुपये (एक फूल)सिमस् कार्निमेशन १ हजार (एक फूल)जरभरा ६० ते ७० (६ फुले)हायटेन जेली ३०० रुपये (एक फूल)

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सवगणेशोत्सव