मुंबई - दादर स्थानकावरील फलाट क्रमांक १ आणि २ हे कायम गर्दीने फुललेले असतात. सायंकाळी या दोन्ही फलाटांवर मुंगी शिरायलाही जागा राहात नाही. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने फलाट क्रमांक १च्या रुंदीकरणाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून या कामाला सुरुवात होणार आहे. हे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे दादर लोकल तूर्त बंद राहणार आहे. परिणामी ऐन सणोत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार फलाट १ चे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून दादर स्थानकापर्यंतच्या काही गाड्या परळपर्यंत धावणार आहेत आणि तेथूनच पुन्हा रवाना होतील. दादर स्थानकात होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी दादर फलाट क्रमांक १ ची सध्याची लांबी २७० मीटर आणि रुंदी ७ मीटर आहे.
दादर लोकल परळहून सुटणार, वेळापत्रक पुढीलप्रमाणे... ठाणे-दादर : ८.१३ वाजता परळला पोहोचेल आणि ८.१७ वाजता परळहून कल्याणसाठी निघेल. टिटवाळा-दादर : ९.४२ वाजता परळला पोहोचेल आणि कल्याणसाठी ९.४४ वाजता परळहून कल्याणसाठी निघेल. कल्याण-दादर : १२.५८ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी १३.०१ वाजता निघेल. ठाणे-दादर : १७.५४ वाजता परळला पोहोचेल आणि १७.५६ वाजता परळहून डोंबिवलीसाठी निघेल. ठाणे-दादर : १८.१३ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी १८.१५ वाजता निघेल. डोंबिवली-दादर : १८.३८ वाजता परळला पोहोचेल आणि कल्याणसाठी १८.४० वाजता परळ निघेल. ठाणे-दादर : १९.०६ वाजता परळला पोहोचेल आणि १९.०८ वाजता परळ कल्याणसाठी निघेल. डोंबिवली-दादर : १९.४२ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून डोंबिवलीसाठी १९.४२ वाजता निघेल. ठाणे-दादर : १९.५२ वाजता परळला पोहोचेल आणि १९.५४ वाजता परळ ठाणेसाठी निघेल. कल्याण-दादर : २०.२३ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी २०.२५ वाजता निघेल. ठाणे-दादर : २२.२३ वाजता परळला पोहोचेल आणि २२.२५ वाजता ठाण्यासाठी निघेल.