देशात ‘आपली मुंबई, सुरक्षित मुंबई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:21 AM2017-07-31T01:21:17+5:302017-07-31T01:21:17+5:30

देशातील दहा सर्वाधिक अपघाती मृत्यू होणा-या शहरांच्या यादीत मुंबई सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईत २ हजार ५५१ अपघात प्रकरणांत २ हजार २८९ जखमी झाले असून

daesaata-apalai-maunbai-saurakasaita-maunbai | देशात ‘आपली मुंबई, सुरक्षित मुंबई’

देशात ‘आपली मुंबई, सुरक्षित मुंबई’

Next

महेश चेमटे ।
मुंबई : देशातील दहा सर्वाधिक अपघाती मृत्यू होणाºया शहरांच्या यादीत मुंबई सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईत २ हजार ५५१ अपघात प्रकरणांत २ हजार २८९ जखमी झाले असून, ६११ मृत्युमुखी पडले आहेत. देशभरातील अपघाती राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. ट्रान्सपोर्ट रिसर्च विंग (टीआरडब्ल्यू) आणि नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी)च्या आकड्यांवरून ही माहिती समोर आली आहे.
देशभरातील रस्ते अपघाती मृत्यू आणि वाहतुकीच्या संदर्भातील आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. एनजीओने सादर केलेल्या या आकडेवारीनुसार रस्ते अपघाती शहरांच्या यादीत मुंबई सातव्या क्रमांकावर आहे. अपघात झाल्यावर तत्काळ उपचार मिळाल्याने जखमींचे प्राण वाचविता येणे शक्य आहे. अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईतील रस्ते अपघातांना तत्काळ उपचार मिळत असल्याने, अपघाती मृत्यू शहरांच्या यादीत मुंबई सातव्या क्रमांकावर असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. परिणामी, देशातील अन्य शहरांच्या तुलनेत अपघाती उपचारांसाठी मुंबई सुरक्षित असल्याचे दिसून येते. या यादीत दिल्ली अव्वल क्रमांकावर आहे. दिल्लीत ७ हजार १४८ प्रकरणांमध्ये ७ हजार ३८५ लोक जखमी झाले असून, १ हजार ३७६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सर्वाधिक कमी अपघाती मृत्यूची नोंद हैदराबाद शहरात आहे. हैदराबाद येथे २ हजार ७६१ प्रकरणांत ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: daesaata-apalai-maunbai-saurakasaita-maunbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.