Join us

डहाणू फ्लीपरची ख्याती सातासमुद्रापार

By admin | Published: April 09, 2017 12:38 AM

व्हेनीस येथे बहुराष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषदेत डहाणूतील कासव पुनर्वसन केंद्रात, अपंग कासवाला प्लॅस्टिकचे कल्ले लावण्याचा डॉ. दिनेश विन्हेरकर यांच्या अभिनव प्रयोगाचा

- अनिरूद्ध पाटील,  बोर्डीव्हेनीस येथे बहुराष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषदेत डहाणूतील कासव पुनर्वसन केंद्रात, अपंग कासवाला प्लॅस्टिकचे कल्ले लावण्याचा डॉ. दिनेश विन्हेरकर यांच्या अभिनव प्रयोगाचा गौरव करण्यात आला. जगभरातील पशुवैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज २५ ते २९ मार्च रोजी झालेल्या या परिषदेत सहभागी झाले होते. गोल्डफिश या माशावर केलेली सर्जरी आणि कासवांमध्ये आढळणारे ट्युमर या विषयाच्या सादरीकरणासाठी ते तेथे गेले होते. डॉ. डग्लस मेडर यांनी जखमी सागरी कासवांसाठी कृत्रिम अवयव हा प्रबंध सादर केला. यात डहाणू फ्लीपरचा उल्लेख मूलभूत संशोधनातील ऐतिहासिक घटना म्हणून केला, शिवाय त्यांना गौरविण्यात आले.फ्लीपर म्हणजे काय ?डहाणूतील वनविभागाच्या कासव पुनर्वसन केंद्राचे वाइल्डलाइफ कन्झर्वेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशनद्वारे कामकाज होते. त्यात जखमी सागरी कासवांवर डॉ. दिनेश विन्हेरकर उपचार करतात. पुढील दोन्ही कल्ले गमावलेल्या कासवाला, जयपूर फूटप्रमाणे रचना असलेले प्लॅस्टिकचे कल्ले लावल्याने, त्याला पोहणे व दिशा बदलणे शक्य झाले. ‘लोकमत’ने ४ फेब्रुवारी रोजी या प्रयोगाचे ‘अपंग कासवाला नवसंजीवनी’ या शीर्षकाअंतर्गत वृत्त प्रसिद्ध केल्याने तो सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. या कासवाचे नामकरण ‘नमो’ असे झाले, तर या अभिनव प्रयोगाचा उल्लेख ‘डहाणू फ्लीपर’ नावाने केला गेला. ‘भारतीय बनावटीच्या या तंत्राचे बहुराष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषदेतर्फे कौतुक होणे ही अभिमानाची बाब आहे. कासवांवरील संशोधन व त्यांच्या संवर्धनासाठी यामुळे प्रेरणा मिळणार आहे.’- डॉ. दिनेश विन्हेरकर,पशुवैद्य