Join us

डहाणूत विजेचा लपंडाव

By admin | Published: June 10, 2015 10:46 PM

तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीच्या डहाणू धाकटी डहाणू चिंचणी, वरोर, वाढवण, वाणगांव या गावांमध्ये पावसाळासुरू होण्यापूर्वीच विजेचा लपंडाव सुरू आहे.

डहाणू : तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीच्या डहाणू धाकटी डहाणू चिंचणी, वरोर, वाढवण, वाणगांव या गावांमध्ये पावसाळासुरू होण्यापूर्वीच विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी वीजवितरण कंपनीने यात सुधारणा न केल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश पारेख यांनी दिला आहे. डहाणू शहरात गेल्या महिन्याभरापासून भारनियमन सुरू आहे. वीज नसल्याने अनेक छोटेमोठे उद्योग बंद पडत आहेत. रात्री वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. मागील ४० वर्षांत या भागातील वीज तारा बदलल्या नसल्याने अनेकवेळा त्या तुटून वीजपुरवठा खंडित होतो. मागील वर्षी वीजवितरण कंपनीने दिल्लीच्या एका कंपनीला येथील तारा आणि खांब बदलण्यासाठी १३२ कोटींचा ठेका दिला होता. मात्र तो पूर्ण झाला नसल्याने परिसरात वीजेचा लपंडाव सुरुच आहेत.