डहाणू नगर परिषदेचे अंदाजपत्रक करवाढमुक्त
By admin | Published: February 25, 2015 10:48 PM2015-02-25T22:48:38+5:302015-02-25T22:48:38+5:30
हाणू नगर परिषदेच्या २०१४-१५ च्या सुधारीत अंदाजपत्रकात कोणतही दर अथवा करवाढ आलेली नाही. याबाबतची सर्वसाधारण सभा
डहाणू : डहाणू नगर परिषदेच्या २०१४-१५ च्या सुधारीत अंदाजपत्रकात कोणतही दर अथवा करवाढ आलेली नाही. याबाबतची सर्वसाधारण सभा बुधवारी रिलायन्स कम्युनिटी हॉल येथे पार पडली. त्यामध्ये डहाणू नगरपरिषदेचा ८३,७९,३९,७०० रक्कमेचे अंदाजपत्रक सादर झाले. यावेळी वार्षिक उत्पन्न वगळता ६ कोटी ५८ लाखांच्या शिल्लकी अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली. कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात येणार नसल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. यावेळी नगराध्यक्ष मिहिर शहा, उपनगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, विरोधी पक्षनेता भरत राजपुत, नगरसेवक शशी बारी, शमी पिरा यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेत अर्थसंकल्पातील काही सूचना करण्यात आल्या.
डहाणू नगरपरिषदेचा यंदाच्या अर्थसंकल्पात प्राधान्याने डहाणू शहरातील चौक सुशोभीकरण करणे. बागबगीचे बनवणे, विकास योजनेतील आरक्षणे विकसीत करणे, स्ट्रीट लाईटसाठी एल/ई.डी.सी.फी. एल. फल्ड लाईट व उपकरणे बसवणे, मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना राबवणे, युवक युवतींना उद्योजकता प्रशिक्षण राबवणे, महिला व बालकल्याण कार्यक्रम राबवणे, अपंग कल्याण कार्यक्रम राबवणे इ. महत्वाच्या विषयांचा समावेश केला आहे.