Join us

Dahi Handi 2022 Live : मुंबईत आतापर्यंत ११६ गोविंदा जखमी; २३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 10:14 AM

मुंबई - राज्यात कृष्णजन्माष्टमीची धूम पाहायला मिळत असून आजे मुंबई , ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. ...

20 Aug, 22 01:02 AM

ठाण्यात मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाला डबल लॉटरी; प्रो गोविंदाच्या 3 लाखांसह, 9 थरांचे 5 लाखही जिंकले

अचूक वेळेत थर लावणे आणि तो पुन्हा तसाच उतरविणे, अशा प्रो गोविंदाच्या तीन लाख रुपयांच्या बक्षिसासह, नऊ थर यशस्वीपणे लावून सलामी देणाऱ्या मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाने पाच लाखांचे बक्षीसही जिंकले आहे. अशा प्रकारे, जय जवान गोविंदा पथकाने एकूण एकूण आठ लाखांचे पारितोषिक जिंकले आहे.

20 Aug, 22 12:33 AM

दहीहंडी कार्यक्रमादरम्यान, मुंबईत आतापर्यंत ११६ गोविंदा जखमी

दहीहंडीदरम्यान, मुंबईत आतापर्यंत ११६ गोविंदा जखमी झाले आहेत. यांपैकी ९३ जणांना उपचार करून सोडण्यात आले आहे. तर २३ जणांवर उपचार सुरू आहेत 
 

20 Aug, 22 12:25 AM

ठाण्यातील मानाच्या हंडीचा नऊ थरांचा विक्राम जय जवानच्या गोविंदांकडून कायम!

जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने दहा थर लावून जागतीक  विक्रम करण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. यानंतर याच दहीहंडीला त्यांनी नऊ थराची सलामी देत संध्याकाळी उशिरापर्यंत दहा थर लावून हंडी फोडण्याचा संकल्प केला होता. पण तो झाला नाही. त्यामुळे यंदाचा दहा थराचा विक्रम पुढच्या वर्षी करण्यासाठी कायम आहे.
 

19 Aug, 22 09:49 PM

दहीहंडीदरम्यान, मुंबईत आतापर्यंत १११ गोविंदा जखमी

दहीहंडीदरम्यान, मुंबईत आतापर्यंत १११ गोविंदा जखमी झाले आहेत. पैकी ८८ जणांना उपचार करून सोडून देण्यात आले. तर २३ जणांवर उपचार सुरू आहेत 

19 Aug, 22 09:33 PM

खेळता खेळता गोविंदाचा मृत्यू, रत्नागिरीत दहीहंडी वर शोककळा

हर्णै पाज पंढरी गावात कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह गेला पोहोचला होता यामध्ये चौगुले सहभागी झाले होते परंतु नाचत असतेवेळी अचानक त्यांच्या छातीत कळ आली , अधिक उपचारासाठी हलविण्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला.

19 Aug, 22 09:26 PM

ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सवात थरांवरून कोसळून३५ गोविंदा जखमी

हंड्यातील लोणी लुटण्यासाठी लावण्यात येणार्‍या थरावरून पडून ३५ गोविंदा कीरकोळ जखमी झाल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयासह छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात  करण्यात आली. यामध्ये २९ जणांवर प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले आहे. तर, ६ जणांवर रुग्णालयात दाखल करण्यात आले

19 Aug, 22 09:02 PM

खेळता खेळता गोविंदाचा मृत्यू, रत्नागिरीत दहीहंडी वर शोककळा

हर्णै पाज पंढरी गावात कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह गेला पोहोचला होता यामध्ये चौगुले सहभागी झाले होते परंतु नाचत असतेवेळी अचानक त्यांच्या छातीत कळ आली , अधिक उपचारासाठी हलविण्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला.

19 Aug, 22 08:40 PM

महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले - भास्कर जाधव

ठाणे - दोन वर्ष कोरोनामुळे आपण हा उत्सव साजरा करू शकलो नाही. कोरोना काळात उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते अनेक प्रकारचे टीका झाले आरोप झाले अडचण निर्माण करण्यात आल्या मात्र उद्धव ठाकरे कुठेही विचारलेत नव्हता त्यांनी महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढले गुढीपाडवा शिमगा आणि आज आपण गोकुळाष्टमीचा सण धुमधडाक्यात साजरा करीत आहोत त्याचे कारण उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व गुण हेच मान्य करावे लागेल असं शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
 

19 Aug, 22 08:30 PM

मुंबईत आतापर्यंत 78 गोविंदा जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
 

19 Aug, 22 08:07 PM

आता सर्व सण होणार जोरात साजरे; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

ठाणे : आता गोविंदा जोरात गणेश उत्सव जोरात नवरात्र उत्सव जोरात आता सर्वच काही जोरात होणार अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
 

19 Aug, 22 07:41 PM

दहीहंडी उत्सवात थरांवरून कोसळून ५ गोविंदा जखमी

ठाणे -  यंदा दहीहंडी उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या हंड्यातील लोणी लुटण्यासाठी लावण्यात येणार्‍या थरावरून पडून ५ गोविंदा किरकोळ जखमी झाल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयासह छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात  करण्यात आली. यामध्ये १५ आणि १६ वर्षीय बालकांचा समावेश असून त्यांच्या हाताला दुखापत झाली असल्याची  माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
 

19 Aug, 22 07:15 PM

बोल बजरंग बली की जय म्हणत गोविंदा पथकांची ठिकठिकाणी सलामी

19 Aug, 22 06:56 PM

भिवंडी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

भिवंडीत दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.शहरात ठीक ठिकाणी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांनी हजेरी लावत बोल बजरंग, बली की जय घोषणा देत मानाच्या दहीहंडीला सलामी दिल्या.भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे चौकात धर्मवीर मंडळाच्या वतीने शिंदे समर्थक देवानंद थळे व सुभाष माने यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवात शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी विशेष उपस्थिती दर्शवित गोविंदा पथकांचे स्वागत करत दहीहंडी उत्सव खेळाडू वृत्तीने खेळत आपली परंपरा जपण्याचे आव्हान गोविंदा पथकांना केले. 
 

19 Aug, 22 06:45 PM

किशोरी पेडणेकर मुंबईच्या के ए एम रुग्णालयात दाखल

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या मुंबईच्या के ए एम रुग्णालयात दाखल, जखमी  गोविंदांवरील उपचार आणि इतर गोष्टीसंदर्भात माहिती घेतली. 


 

19 Aug, 22 06:20 PM

आमदार शहाजीबापू पाटलांच्या डायलॉगबाजीला गोविंदां पथकाने दिली जोरदार दाद

सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा गुवाहटी येथे त्यांच्या देशासह विदेशात लोकप्रिय झालेला काय झाडी, काय डोंगर, सर्वकाही ओके हा डायलॉग बोलून त्यांच्या डायलॉगबाजीला उपस्थित गोविंदा पथकांची आणि मागाठाणेच्या नागरिकांनी जोरदार दाद दिली. मागाठाणे दहिकला महोत्सवात त्यांनी भेट देऊन येथील गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.
 

19 Aug, 22 05:50 PM

विकासाची हंडी शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्याचा सरकारचा ठाम निर्धार - देवेंद्र फडणवीस

तुमचे सरकार आले असून आम्ही भ्रष्टाचाराची हंडी फोडली आहे. विकासाची हंडी शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्याचा सरकारचा ठाम निर्धार असून सरकार तुमच्या पाठीशी असून गोविंदा बरोबरच येणारे गणपती व नवरात्र उत्सव जोऱ्यात साजरा होणार आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचा साहसी खेळात समावेश केला आहे - देवेंद्र फडणवीस

19 Aug, 22 05:07 PM

राज्य सरकार गोविंदांच्या पाठीशी - मुख्यमंत्री

तुम्हाला गोविंदाचा आनंद घेता यावा यासाठी राज्य सरकारने आज सुट्टी जाहिर केली.राज्य सरकार तुमच्या पाठीशी असून कालच राज्य सरकारने गोविंदा पथकाचा साहसी खेळात समावेश केला आहे आणि त्यांना विमा संरक्षण,अपघात झाल्यास मोफत उपचार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काळजी घेऊन थर लावा, दुखापत होणार नाही याची काळजी घ्या - मुख्यमंत्री 

19 Aug, 22 03:57 PM

पीपीई कीट घालून आला गोविंदा

कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर घणसोली येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सानपाड्याचे बाळा स्मृती कै भावेश मूर्ती गोविंदा पथकातील गोविंदाने कोरोना किट घालून सलामी दिली. कोरोनातील आठवणींना उजाळा देत दोन वर्ष न झालेल्या दहीहंडी उत्सवाकडे लक्ष वेधले

19 Aug, 22 03:52 PM

आदित्य ठाकरेंनी टिका टाळली, आज चांगला दिवस

19 Aug, 22 02:51 PM

साई संस्थानकडुन दहिहंडीचे आयोजन

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने "गोपालकाला" निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिराच्‍या समोरील स्‍टेजवर सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत गोपालकाला कीर्तन झाले. त्‍यानंतर दुपारी १२.०० वाजता समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्‍यात आली. 

19 Aug, 22 02:47 PM

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच - फडणवीस

19 Aug, 22 02:46 PM

धुळे महापालिकेत समस्यांची हंडी

धुळे महानगरपालिका शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धुळेकरानी आंदोलने करूनही मनपा प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारच्या समस्या न सोडवल्याने धुळे महानगर मनसे च्या वतीने नागरी समस्यांची हंडी धुळे महापालिका आयुक्त यांच्या दानाला बांधून प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे

19 Aug, 22 02:40 PM

दीड महिन्यांपूर्वी सगळ्यात मोठी हंडी फोडली - शिंदे

दीड महिन्यांपूर्वी सगळ्यात मोठी हंडी फोडली, ५० थर लावले आहेत. भविष्यात हे थर वाढत जातील काळजीचं कारण नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकावर जोरदार टिका केली. तसेच, गुवाहाटीला जायचंय?. कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊया लवकरच, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.  
 

19 Aug, 22 01:37 PM

नयन फाउंडेशनच्या दृष्टिहीन गोविंदानी लावले 4 थर

कोरोना काळानंतर दोन वर्षे निर्बंध उठवल्यानंतर आज आनंदाने दहीहंडी उत्सव साजरी असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दादर येथील साई दत्त मित्र मंडळ आयोजित इकोफ्रेडंली दहीहंडी उत्सवात नयन फांऊडेशन दृष्टिहीन गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला आणी सलग चार थर लाउन सलामी दिली. 

दृष्टहीन असुनही दहीहंडीचा थर रचने खरंतर खूपच अवघड असंत. मात्र, अंध असूनही यांनी दहीहंडीचे चार थर रचून एक नवी ऊर्जा निर्माण केली. या पथकात महिला आणि पुरुष सहभागी होते.
 

19 Aug, 22 12:55 PM

पनवेलमध्ये 276 वर्षे जुनी परंपरेची दहीहंडी

पनवेल - शहरातील 276 वर्षीय जुनी पारंपारिक दहीहंडीचा यंदा थरार, गोविंदांमध्ये मोठी उत्सुकता अन् जल्लोष

19 Aug, 22 11:54 AM

ठाण्यात अविनाथ जाधव यांची दहीहंडी

कोकणचा राजा दहीहंडी पथकानं ठाण्यात अविनाश जाधव यांच्या दहीहंडीत ९ थर रचले. यापाठोपाठ भांडूपमध्ये जय जवान गोविंदा पथकाहीची ९ थरांची यशस्वी सलामी

19 Aug, 22 11:53 AM

ठाण्यात मनसेची दहीहंडी

कोकण नगर गोविंदा पथक जोगेश्वरी यानी ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीत 9 थर रचून सलामी दिली

19 Aug, 22 11:22 AM

दहीहंडी अन् पोलिसांचा बँड, खाकीने धरला ताल

19 Aug, 22 11:05 AM

दहीहंडीत बीडमध्ये सपना चौधरीचे ठुमके

19 Aug, 22 10:56 AM

ठाणे पूर्व येथील श्री साईं दाहिकाला उत्सव मंडळ

19 Aug, 22 10:23 AM

नागपुरात गोविंदा पथकाने जिंकले 2.22 लाख

नागपूर - शहरात मोठ्या थाटात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या उत्सवाला महिलांनी दहीहंडी फोडण्यात बाजी मारली. महिलाची दहीहंडी तीस फूट होती, पण ती 20 फुटांवर फोडण्यात आली. शीतला माता महिला मंडळ यांनी ही दहीहंडी फोडली असून त्यांना 51 हजार रुपयांचा प्रथम पारितोषिक मिळालं. पुरुषांच्या दहीहंडीमध्ये जय भोलेश्वर क्रीडा मंडळ याने तीस फुटावर हंडी फोडून ही बाजी मारली. या मंडळाला 2 लाख 22 हजारचा प्रथम पारितोषिक पटकावलं.
 

टॅग्स :दहीहंडीमुंबईठाणे