Join us  

अश्लील गाणे पडणार महागात; महिलांबाबत पोलिसांकडून दहीहंडीत कारवाईचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 10:13 AM

दहीहंडीच्या उत्साहात शहरातील कायदा - सुव्यवस्था बिघडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दहीहंडीच्या उत्साहात शहरातील कायदा - सुव्यवस्था बिघडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्दांचे उच्चार, घोषणा किंवा अश्लील गाणी गाऊ नयेत, यासह पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, सुका रंग उधळू, पाण्याचे फुगे फेकू नये, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. 

पोलिस उपायुक्त (अभियान) गणेश गावडे यांनी याबाबतच्या सूचना जारी केल्या आहे. त्या २५ ऑगस्ट रात्री १२ पासून २७ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या काळात सामाजिक तेढ, धार्मिक तंटे उद्भवू नयेत, महिलांविरोधी गुन्हे घडू नयेत, यासाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

‘रंग, पाणी फेकू नका’-

१) सार्वजनिक ठिकाणी अश्लील टीका-टिप्पणी, घोषणा किंवा अश्लील गाणी गाऊ नयेत. एखादी व्यक्ती, समाज किंवा धर्माची प्रतिष्ठा, नैतिकता दुखावेल, असे हातवारे, नक्कल करू नये, तसेच तयार प्रतिमा, चिन्हे, फलक किंवा इतर वस्तूंचे प्रदर्शन, प्रसार करू नये. 

२) पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, सुका रंग उधळू, फेकू नये. पाणी किंवा अन्य कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे फेकू नयेत, अशा सूचना पोलिसांनी जारी केल्या आहेत.  

टॅग्स :मुंबईदहीहंडीपोलिस