दहीहंडीत चमकणार ‘लाख’मोलाचे सितारे; बिग बॉसच्या स्पर्धकांना सर्वाधिक मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 03:33 AM2018-09-02T03:33:09+5:302018-09-02T03:33:22+5:30

‘बोल बजरंग बली की जय...’ हा गजर सोेमवारी आसमंतामध्ये गुंजणार आहे. निमित्त आहे ते गोकुळाष्टमीचे. गोविंदांच्या टोळ्या मुंबईतील गल्लोगल्ली फिरून हंडी फोडण्यासाठी आता सज्ज झाल्यात.

Dahihand will glow up millions of stars; The biggest demand for Big Boss contestants | दहीहंडीत चमकणार ‘लाख’मोलाचे सितारे; बिग बॉसच्या स्पर्धकांना सर्वाधिक मागणी

दहीहंडीत चमकणार ‘लाख’मोलाचे सितारे; बिग बॉसच्या स्पर्धकांना सर्वाधिक मागणी

Next

मुंबई : ‘बोल बजरंग बली की जय...’ हा गजर सोेमवारी आसमंतामध्ये गुंजणार आहे. निमित्त आहे ते गोकुळाष्टमीचे. गोविंदांच्या टोळ्या मुंबईतील गल्लोगल्ली फिरून हंडी फोडण्यासाठी आता सज्ज झाल्यात. या उत्साहात दहीहंडी आयोजकही मागे नाहीत. आपल्या स्टेजवर मोठा सेलीब्रिटी आणून, जास्तीत जास्त गर्दी खेचण्याची रस्सीखेच आयोजकांमध्येही दिसते आहे. बिग बॉसची लोकप्रियता अजूनही कायम असल्यामुळे या वर्षीच्या दहीहंडीत लाखो रुपये मोजून या पर्वातील स्पर्धकांना आपल्या स्टेजवर आणण्याची धडपड आयोजकांनी सुरू केली आहे. त्यामुळे बिग बॉसचे पर्व संपल्यावरही त्यातील स्पर्धकांना दहीहंडीच्या निमित्ताने ‘अच्छे दिन’ आले आहेत.
मुंबईत दहीहंडीचा जोर या वेळी पूर्वीपेक्षा थोडा कमी आहे. तरी लाखोंची बक्षिसे ठेवणाऱ्या राम कदम, प्रकाश सुर्वे या राजकारणी मंडळींनी आपल्या या वर्षीच्या उत्सवात बॉलीवूडबरोबरच मराठी सिताºयांनाही खास आमंत्रित केले आहे. आतापर्यंत बॉलीवूडच्या चेहºयांना पसंती देणाºया आयोजकांनी या वर्षी मात्र मराठी सिताºयांना मैदानात उतरवण्याचा चंग बांधला आहे. मागाठाणे भागात दरवर्षी भव्य दहीहंडीचे आयोजन करणारे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी रविना टंडनबरोबरच बॉलीवूडमध्ये सध्या लोकप्रिय असलेल्या मराठमोळ्या राधिका आपटेलाही आमंत्रण दिले आहे. अभिनेत्री श्रुती मराठे, अनिकेत विश्वासराव, तर बिग बॉसपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली स्मिता गोंदकरही या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. यासाठी आयोजकांनी या स्टार्सना लाखो रुपये मोजले आहेत.
सध्या दहीहंडीचे केंद्र मुंबईपासून ठाणे शहराकडे हलले आहे. मात्र, मराठमोळ्या दहीहंडी उत्सवाला ठाणे शहराने वेगळ्या उंचीवर नेले आहे. ठाणे शहरात यंदा शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांसोबतच भाजपानेही पहिल्यांदाच भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले आहे. भाजपाच्या या उत्सवासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार त्यांची कला सादर करणार आहेत. सोमवारी रात्री सेलीब्रिटींची दहीहंडी हे येथील आकर्षण असेल. त्यात सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, रूपाली भोसले, मीरा जोशी, केतकी चितळे, राधा कुलकर्णी, स्मिता शेवाळे, सिया पाटील, मधुरा देशपांडे, प्रीती सदाफुले आणि माधवी निमकर हे कलाकार तसेच अभिजीत कोसंबी आणि अन्य चार गायक कलाकार यात सहभागी होणार आहेत.
त्यामुळे आपल्या चाहत्या कलाकारांची कला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची संधी मुंबईकर दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुभवणार आहेत.

आयोजकांची विम्याकडे पाठ
अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवाकरिता शहर-उपनगरात उत्साहाचे वातावरण आहे. उच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधानंतर गोविंदा पथकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यामुळे गोविंदा पथकांना विमा काढण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीने कंबर कसली आहे.
त्यामुळे वैयक्तिकरीत्या आणि प्रायोजकांच्या माध्यमातून यंदा एकूण ९२१ गोविंदा पथकांनी विमाकवच घेतले आहे. मात्र, आयोजनाच्या परिसराचा विमा काढण्याकडे आयोजकांनी पाठ फिरवली आहे. केवळ ठाण्यातील तीन आयोजकांनी हा विमा काढल्याची माहिती दहीहंडी समन्वय समितीने दिली.

बिग बॉसची लोकप्रियता अजूनही कायम असल्यामुळे या वर्षीच्या दहीहंडीत लाखो रुपये मोजून या पर्वातील स्पर्धकांना आपल्या स्टेजवर आणण्याची धडपड आयोजकांनी सुरू केली आहे. त्यामुळे बिग बॉसचे पर्व संपल्यावरही त्यातील स्पर्धकांना दहीहंडीच्या निमित्ताने ‘अच्छे दिन’ आले आहेत.

प्रदूषणविरहित सेलीब्रिटी दहीहंडी
दादर येथील आयडियल बुक कंपनी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सेलिब्रिटी दहीहंडी साजरी केली जाणार आहे. मराठी वाहिन्यांवरील मालिकेतील कलाकार या वेळी उपस्थित राहून स्वत: दहीहंडी फोडणार आहेत. ध्वनी प्रदूषण व पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून, प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर साजरी होणारी ही राज्यातील एकमेव दहीहंडी असल्याचे आयोजकांनी सांगितले.

विमापूर्तीसाठी महत्त्वाचे...
विम्याची पूर्तता करण्यासाठी मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदाचे नाव आणि वय अशी यादी असणे गरजेचे आहे. तर विमा संरक्षणाचा कालावधी गुरुपौर्णिमा किंवा विमा प्रीमियमपासून गोविंदाचा सराव आणि ४ सप्टेंबर पहाटे ६ वाजेपर्यंत आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड येथील केवळ ९२१ पथकांनी काढला विमा
गेल्या काही वर्षांपासून शहर-उपनगरातील अनेक गोविंदा पथके सर्रास सात, आठ थर रचतात. हे थर रचताना त्यातील धोका पाहता त्यातूनच गोविंदा खेळाडूंचा विम्याची संकल्पना जन्मास आली आणि रुजली. यंदा एकूण ९२१ गोविंदा पथकांनी विमा काढला आहे, तर गेल्या वर्षी ही संख्या केवळ ३८९ इतकी आहे. विमा काढलेल्या पथकांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, वसई, विरार, रायगड येथील सर्वांचा समावेश आहे. वैयक्तिकरीत्या विमा काढणाºया पथकांची संख्या यंदा ३३५ आहे, तर प्रायोजकांनी पुढाकार घेत गोविंदा पथकांच्या काढलेल्या विम्याची संख्या ४१५ आहे. तर उत्सवाच्या दिवसाकरिता आयोजकांनी पुढाकार घेऊन १७१ गोविंदा पथकांचा विमा काढला आहे. यात भाजपाने १३९, वसई विरार महानगरपालिकेने ७८, साई सेवा मेडिकल ट्रस्ट ६०, सीताबेन शहा ट्रस्ट ७३, जनता जागृती मंच २३, एसडी कॉर्पोरेशन ४२ इतक्या पथकांचा विमा काढला आहे. तर डोंबिवलीतील भाजपाच्या आयोजकांनी १००, खासगी एनर्जी ड्रिंक कंपनीने २३ आणि अन्य ३० गोविंदा पथकांचा विमा काढला आहे.

सुरक्षेला प्राधान्य
उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आम्ही समितीतर्फे वेगवेगळे प्रयत्न करत आहोत. त्यात महत्त्वाचे म्हणजे, गोविंदा पथकांनी विमा काढणे हे आहे. त्यानंतर गोविंदा पथकातील प्रत्येक खेळाडूने सुरक्षेचे नियम पाळावे, त्यात हेल्मेट, जॅकेट्स घालावेत. शिवाय, गिर्यारोहण पद्धतीचा वापर करावा. आपल्या क्षमतेप्रमाणे प्रत्येक पथकाने थर रचावेत.
- बाळा पडेलकर, अध्यक्ष, दहीहंडी समन्वय समिती

Web Title: Dahihand will glow up millions of stars; The biggest demand for Big Boss contestants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.