मुंबई : दहीहंडीदरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झालेले नाही. सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या होत्या, अशी माहिती देत अवमान याचिका निकाली काढावी, अशी विनंती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला केली.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्य सरकारने फेब्रुवारी २०१५ मध्ये दहीहंडी समिती नेमली. अध्यक्ष म्हणून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची नियुक्ती केली. बुधवारी शेलार यांनीच न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्यापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले.राज्यभरातील दहीहंडी आयोजकांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केले. राज्य सरकार आणि आयोजकांवर कारवाई करण्यास अपयशी ठरल्याने राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय व शेलार यांच्यावर अवमान कारवाई करण्यात यावी, अशी याचिका स्वाती पाटील यांनी केली होती. (प्रतिनिधी)
‘दहीहंडीत नियमांचे उल्लंघन नाही’
By admin | Published: April 15, 2016 2:37 AM