Join us

‘टाइम्स स्क्वेअर’मध्ये दहीहंडी अधांतरी

By admin | Published: September 11, 2014 1:17 AM

यंदा भारतात नोव्हेंबरमध्ये दिवाळी साजरी होणार आहे. मात्र त्याआधीच या महिन्यातच अमेरिकेत दिवाळीचे फटाके फुटतील.

चिंचोली लिंबाजी- कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्प पावसामुळे १०० टक्के भरला असून, पाणी सांडव्यावरून वाहू लागले आहे. त्यामुळे चिंचोली लिंबाजीसह परिसराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, रबी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या १५ दिवसांपासून चिंचोली लिंबाजी परिसरात व धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत होती. शनिवारी सांडव्यावरून पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली व पाणी नदीच्या दिशेने वाहू लागले आहे. त्यामुळे पुढच्या उन्हाळ्यापर्यंत नागरिकांना पाणीटंचाई भासणार नाही. नेवपूर, वाकी, घाटशेंद्रा, टाकळी अंतुर, लोहगाव, चिंचोली लिंबाजी, परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागला आहे. गेल्यावर्षी हे धरण उशिरा भरले होते. यावर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हे धरण ओसंडून वाहू लागल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. यंदा परिसरात सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे खरीप हंगामाबरोबर रबी हंगामही धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली होती. १५ दिवसांपूर्वी धरणात केवळ मृतसाठा शिल्लक होता. यंदा धरण भरेल की नाही या धास्तीने परिसरातील जनता धास्तावली होती. मात्र, गणरायाची कृपा झाल्याने आठ दिवसांतच धरण १०० % भरले असून शनिवारी धरणाच्या सांडव्यावरून पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. शिवना -टाकळी प्रकल्प तहानलेलाच हतनूर : वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायिनी ठरलेला शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पात पावसाळ्याच्या तीन महिन्यांनंतर जलसाठ्यात अंशत: वाढ होऊन फक्त २१ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती प्रकल्प पर्यवेक्षक पांडुरंग पाटील यांनी दिली. पावसाळ्याचे तब्बल तीन महिने संपूनही प्रकल्पाच्या (कॅचमेंट एरिया) पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने शिवना व गांधारी या मुख्य नद्यांना पूर आले नाही. परिणामी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ न होता प्रकल्पात गतवर्षीचाच १८ टक्के पाणीसाठा होता. मात्र, शुक्रवारी दुपारच्या पावसाने शिवना-गांधारी या नद्यांना काही प्रमाणात पाणी आल्याने प्रकल्पाच्या पाणीपातळीत अंशत: फक्त ३ टक्केच वाढ होऊन २१ टक्क्यांपर्यंत स्थिरावला.