दहिसर-अंधेरी मेट्रो मार्गावर रोप-वेमधून होणार प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 01:17 PM2023-03-25T13:17:18+5:302023-03-25T13:17:57+5:30

७.२ किलोमीटर लांबीच्या या रोप-वे प्रकल्पासाठी नव्याने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत.

Dahisar-Andheri metro route will travel through rope-way | दहिसर-अंधेरी मेट्रो मार्गावर रोप-वेमधून होणार प्रवास

दहिसर-अंधेरी मेट्रो मार्गावर रोप-वेमधून होणार प्रवास

googlenewsNext

मुंबई : दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ मार्गिकेतील महावीर मेट्रो स्थानक आणि पॅगोडादरम्यान रोप-वे बांधण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. अनेक तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला नाही. मात्र, आता एमएमआरडीए प्राधिकरणाने रोप-वे बांधण्याच्या दृष्टीने कंबर कसली आहे.
७.२ किलोमीटर लांबीच्या या रोप-वे प्रकल्पासाठी नव्याने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत.  बोरिवली-गोराईदरम्यान ८ किमी लांबीचा आणि मालाड-मार्वेदरम्यान ४.५ किमी लांबीचा रोप-वे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या मे. इंडियन पोर्ट रेल आणि रोप-वे कॉर्पोरेशन लिमिटेडची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मे. इंडियन पोर्ट रेलने २०१९ मध्ये चारकोप-मार्वे आणि महावीरनगर मेट्रो स्थानक ते पॅगोडा असे दोन नवीन रोप-वे सुचवून या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल एमएमआरडीएला सादर केला.

निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने रखडल्या निविदा
  दोन मार्गांवर रोप-वे बांधण्याचे निश्चित करण्यात आले. आणि महावीरनगर मेट्रो स्थानक ते पॅगोडादरम्यान ७.२ किमी लांबीचा रोप-वे उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. 
  निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने निविदा रखडल्या. त्यानंतर निविदेला प्रतिसाद मिळाला. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे निविदा प्रक्रियाच एमएमआरडीएला रद्द करावी लागली.

Web Title: Dahisar-Andheri metro route will travel through rope-way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.