मनोहर कुंभेजकर, मुंबई: मुंबईचे शेवटचे टोक असलेल्या दहिसर स्थानकाबाहेर पश्चिमेला नेहमीच वाहनांची वर्दळ असल्याने वाहतूक कोंडी असते.पालिकेच्या आर उत्तर विभागाने येथील रुंदीकरणात बाधित असलेली बांधकामांवर आज हातोडा मारल्याने दहिसरची वाहतूक कोंडी सुटणार आहे. दहिसर रेल्वे स्थानकासमोर लोकमान्य टिळक मार्ग येथे रस्ता रुंदीकरणात बाधित असलेली बांधकामे तिथून हटवण्याकरिता उपायुक्त परिमंडळ सातच्या उपायुक्त डॉ.भाग्यश्री कापसे यांच्या आदेशानुसार व सहाय्यक आयुक्त नवनीश वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता सहाय्यक अभियंता कल्पक मर्दे,दुय्यम अभियंता अमोल बोडखे, कनिष्ठ अभियंता राहुल चिवडे यांच्या प्रयत्नांनी त्यावर हातोडा मारण्यात आला.
येथील उर्वरित रुंदीकरणात अडथळा आढळणारी बांधकामे टप्प्याटप्प्यामध्ये काढण्याचे उत्तर विभागाचे नियोजन असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
येथील विकासकाकडे पाठपुरावा करून त्याच्या माध्यमातून त्याच्या जमिनीवरील बांधकामे काढण्याकरिता सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे महानगरपालिकेला पोलीस स्थानकाची मदत घेणे आवश्यकता भासली नाही. योग्य समन्वयाने व त्यांचा मोबदला देऊन विकासकाच्या माध्यमातून महानगरपालिकेचे कोणतेही नुकसान न होता कार्यवाही पार पडली अशी माहिती वेंगुर्लेकर यांनी दिली.