दहिसर नदीचे पुनरुज्जीवन

By admin | Published: October 13, 2015 03:10 AM2015-10-13T03:10:02+5:302015-10-13T03:10:02+5:30

दहिसर नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या १५० कोटी रु पयांच्या प्रकल्प अहवालातील सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

Dahisar river revival | दहिसर नदीचे पुनरुज्जीवन

दहिसर नदीचे पुनरुज्जीवन

Next

मुंबई : दहिसर नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या १५० कोटी रु पयांच्या प्रकल्प अहवालातील सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या नदीचे पुनरुज्जीवन व सुशोभीकरण, दहिसर नदीच्या परिसरात खारफुटी उद्यान विकसित करणे आणि गणपत पाटील नगरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आदी कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली.
या बैठकीस आमदार मनीषा चौधरी, महापालिका आयुक्त अजय मेहता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र मेरि टाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शर्मा आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या परिसरातील खारफुटीच्या जंगलाचे रक्षण करण्यासाठी वने, पर्यावरण आणि पर्यटन विभागाच्या मदतीने मँग्रुव्हज पार्क उभारण्यासाठी आवश्यक ती योजना तयार करण्यात यावी. त्याचबरोबर दहिसर परिसरातील गणपत पाटील नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाने समिती नेमून तिचा अहवाल एक महिन्यात सादर करावा, असे आदेश या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Dahisar river revival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.