Join us

दहिसरकरांना मिळणार सायकल ट्रॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पश्चिम उपनगरातील शेवटचे टोक दहिसर असून दहिसर नदी प्रसिद्ध आहे. या नदीच्या लगत बापू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पश्चिम उपनगरातील शेवटचे टोक दहिसर असून दहिसर नदी प्रसिद्ध आहे. या नदीच्या लगत बापू बागवे मार्गावर दहिसरकरांसाठी खास सायकल ट्रॅक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आशीर्वाद कट्टा तयार करण्यात आला आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रभाग क्रमांक ७ च्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या प्रयत्नाने येथील सायकल ट्रॅक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आशीर्वाद कट्टा तयार करण्यात आला आहे.

पर्यावरणाची कास धरत आणि आजच्या तरुण पिढीला सायकल चालविण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करून येथे १८० मीटर लांबीचा खास सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. पश्चिम उपनगरातील अशा प्रकारचा हा पहिलाच सायकल ट्रॅक असून, दहिसरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची माहिती नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला दिली. या सायकल ट्रॅक योजनेला दहिसरकरांचा प्रतिसाद मिळाल्यास येथे भाड्याने सायकल योजना राबविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उद्या, शनिवार २७ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सदर सायकल ट्रॅक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वाद कट्ट्याचे लोकार्पण होणार आहे. या वेळी विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, प्रभाग समिती अध्यक्ष सुजाता पाटेकर, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार, आर उत्तर वॉर्डच्या साहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दिली.