Join us

मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णवाढ तीनशेच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिलासादायक घट होत आहे. शुक्रवारी ही संख्या आणखी कमी होऊन २८५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिलासादायक घट होत आहे. शुक्रवारी ही संख्या आणखी कमी होऊन २८५ बाधित रुग्ण दिवसभरात सापडले. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०४ टक्के एवढा खाली आला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता १८५३ दिवसांवर पोहोचला आहे.

आतापर्यंत मुंबईत सात लाख ३८ हजार ८०७ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख १७ हजार ४५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ९७९ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या दोन हजार ९४६ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या चार रुग्णांपैकी दोन रुग्णांना सहव्याधी होत्या. मृतांमध्ये एक पुरुष, तर तीन महिला रुग्णांचा समावेश होता. यापैकी मृत झालेला एक रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होता, तर तीन मृत ६० वर्षांवरील होते. दिवसभरात ३७ हजार ५२ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत तर आतापर्यंत ८५ लाख ८० हजार ८४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.