राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णवाढ ११ हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 12:55 AM2021-03-08T00:55:25+5:302021-03-08T00:55:53+5:30
रविवारी दिवसभरात ६,०१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात एकूण २०,६८,०४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
मुंबई : राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होतच आहे. रविवारी राज्यात ११,१४१ नवीन काेराेनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून, ३८ मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या २२,१९,७२७ झाली असून, बळींचा आकडा ५२ हजार ४७८ झाला आहे. शनिवारी १०,१८७ बाधितांचे निदान झाले हाेते.
रविवारी दिवसभरात ६,०१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात एकूण २०,६८,०४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.१७ टक्के आहे. सध्या ९७,९८३ रुग्ण उपचाराधीन आहेत. तर सध्या राज्यातील मृत्युदर २.३६ टक्के आहे.
मुंबईत दिवसभरात ५ मृत्यू
मुंबईत रविवारी काेराेनाचे १ हजार ३ रुग्ण आढळले असून ५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ३ लाख ३३ हजार ५६४ वर पोहोचला असून बळींची संख्या ११ हजार ५०० झाली आहे.