लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील दैनंदिन कोरोना बळींची संख्या एक अंकावर आली आहे. मंगळवारी काेराेनाच्या ७२४ रुग्णांचे निदान झाले असून ९ मृत्यूंची नोंद झाली. कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ८४ हजार १८४ वर पोहोचली असून बळींचा आकडा १०,८१० झाला आहे.
आतापर्यंत २ लाख ५७ हजार ९१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी २१३ दिवसांवर पोहोचला आहे.