Join us

मुंबईत दैनंदिन मृत्युसंख्या एक अंकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:07 AM

मुंबई : मुंबईत रविवारी ६९७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ७५ हजार ४६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले ...

मुंबई : मुंबईत रविवारी ६९७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ७५ हजार ४६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५६ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ७ हजार ७७१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नव्या वर्षांत पहिल्यांदाच दैनंदिन बळींची संख्या एक अंकावर आली आहे.

शहर उपनगरात २७ डिसेंबर ते ०२ जानेवारी या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २३ लाख ९३ हजार ५९० चाचण्या झाल्या आहेत. शहर उपनगरात दिवसभरात ५८१ रुग्ण आणि ३ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, शहर उपनगरात कोरोना बाधितांची एकूण संख्या २ लाख ९५ हजार २४० झाली असून मृतांचा आकडा ११ हजार १३५ झाला आहे.

मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या २२१ असून २ हजार ९० सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने २ हजार ६६६ अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.