मुंबई : राज्यात कठोर निर्बंधांनंतर कोरोनाचा कहर कायम आहे, वीकेंड लाॅकडाऊननंतर रुग्णसंख्येत काहीशी घट झालेली दिसून आली. मात्र पुन्हा मंगळवारी ६२ हजार ९७ रुग्ण आणि ५१९ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३९ लाख ६० हजार ३५९ आणि मृतांचा आकडा ६१ हजार ३४३ इतका आहे. सध्या राज्यात सहा लाख ८३ हजार ८५६ रुग्ण उपराचाधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात दिवसभरात ५४ हजार २२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ३२ लाख १३ हजार ४६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१४ टक्के असून, मृत्युदर १.५५ टक्के आहे. राज्यात ३८ लाख ७६ हजार ९९८ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत, तर २७ हजार ६९० व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत.
दिवसभरातील ५१९ मृत्यूंपैकी ३०७ मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर ११४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ९८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या दोन कोटी ४३ लाख ४१ हजार ७३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.२६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मंगळवारी नोंद झालेल्या ५१९ मृत्यूंमध्ये मुंबई ३४, ठाणे ४, ठाणे मनपा ७, भिवंडी निजामपूर मनपा ३, पालघर १५, वसई विरार मनपा ३६, रायगड १४, पनवेल मनपा २, नाशिक २८, नाशिक मनपा २०, मालेगाव मनपा २, अहमदनगर १६, अहमदनगर मनपा १०, धुळे ९, धुळे मनपा ८, जळगाव ७, नंदुरबार १६, पुणे ३, पुणे मनपा २१, पिंपरी चिंचवड मनपा ७, सोलापूर १३, सोलापूर मनपा ४५, सातारा ४, कोल्हापूर १, कोल्हापूर मनपा १, सांगली ५, सांगली मिरज कुपवाड मनपा ६, सिंधुदुर्ग ८, औरंगाबाद ७, औरंगाबाद मनपा १२, परभणी ४, परभणी मनपा २, लातूर ५, लातूर मनपा ४, उस्मानाबाद १२, बीड १६, नांदेड २१, नांदेड मनपा ७, अकोला ३, अकोला मनपा ३, अमरावती ८, अमरावती मनपा ५, वाशिम २, नागपूर ५, नागपूर मनपा १८, वर्धा ८, भंडारा १६, गोंदिया ६, चंद्रपूर २, चंद्रपूर मनपा ६, आणि अन्य राज्य-देशातील २ इ. रुग्णांचा समावेश आहे.
दैनंदिन रुग्ण आलेख
तारीखरुग्णसंख्या
२० एप्रिल ६२,०९७
१९ एप्रिल ५८,९२४
१८ एप्रिल ६८,६३१
१७ एप्रिल ६७,१२३
१६ एप्रिल ६३,७२९
१५ एप्रिल ६१,६९५
१४ एप्रिल ५८,९५२