राज्यात सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:10 AM2021-05-05T04:10:16+5:302021-05-05T04:10:16+5:30
मुंबई : राज्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून आले. राज्यात दिवसभरात ५१ हजार ८८० रुग्ण ...
मुंबई : राज्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून आले. राज्यात दिवसभरात ५१ हजार ८८० रुग्ण आणि ८९१ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने राज्य शासनासाठी काहीशी दिलासादायक बाब आहे. राज्यात दिवसभरात ६५ हजार ९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ४१ लाख ७ हजार ९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४८ लाख २२ हजार ९०२ झाली असून, मृतांचा आकडा ७१ हजार ७४२ झाला आहे. सध्या राज्यात ६ लाख ४१ हजार ९१० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.१६ टक्के झाले असून मृत्युदर १.४९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८१ लाख ५ हजार ३८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.१६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३९ लाख ३६ हजार ३२३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३० हजार ३५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ८९१ मृत्यूंपैकी ३९७ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर २५८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. तर उर्वरित २३६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ८९१ मृत्यूंमध्ये मुंबई ६२, ठाणे ९, ठाणे मनपा ३१, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा २१, भिवंडी निजामपूर मनपा ३, वसई विरार मनपा २, रायगड १५, पनवेल मनपा १४, नाशिक ३३, नाशिक मनपा १६, मालेगाव मनपा ६, अहमदनगर २९, अहमदनगर मनपा १३, जळगाव ३२, जळगाव मनपा ६, नंदुरबार २३, पुणे २८, पुणे मनपा २५, सोलापूर २०, सोलापूर मनपा २२, सातारा १४, कोल्हापूर २९, कोल्हापूर मनपा ९, सांगली १९, सांगली मिरज कुपवाड मनपा ११, सिंधुदुर्ग ८, रत्नागिरी १५, औरंगाबाद ९, औरंगाबाद मनपा १, जालना २२, हिंगोली ६, परभणी ७, परभणी मनपा २, लातूर १२, लातूर मनपा ३, उस्मानाबाद १४, बीड ८, नांदेड २७, नांदेड मनपा ९, अकोला ५, अकोला मनपा ३, अमरावती १८, अमरावती मनपा २, यवतमाळ १३, वाशिम ७, नागपूर २३, नागपूर मनपा ८४, वर्धा २०, भंडारा ११, गोंदिया ७, चंद्रपूर ३०, चंद्रपूर मनपा १२, गडचिरोली १६ इ. रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हानिहाय उपचाराधीन रुग्ण
जिल्हा रुग्ण
पुणे १०९५३१
नागपूर ६४५५४
मुंबई ५६४६५
ठाणे ४५५१६
नाशिक ४५६०५