राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंचा पुन्हा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:06 AM2021-04-19T04:06:34+5:302021-04-19T04:06:34+5:30

मुंबई : राज्यात कठोर निर्बंधांनंतरही कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता तसूभरही कमी झालेली नाही. या उलट राज्यात रोज दैनंदिन रुग्ण आणि ...

Daily high patient and mortality rates in the state again | राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंचा पुन्हा उच्चांक

राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंचा पुन्हा उच्चांक

googlenewsNext

मुंबई : राज्यात कठोर निर्बंधांनंतरही कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता तसूभरही कमी झालेली नाही. या उलट राज्यात रोज दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंच्या संख्येचा उच्चांक गाठला जात असून, कोरोनाचे संकट राक्षसाचे रूप धारण करत आहे. राज्यात रविवारी ६८ हजार ६३१ रुग्ण आणि ५०३ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३८ लाख ३९ हजार ३३८ असून, मृतांचा एकूण आकडा ६० हजार ४७३ झाला आहे. राज्यात शनिवारीही रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता.

सध्या राज्यात ६ लाख ७० हजार ३८८ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात मागील २४ तासांत ४५ हजार ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ३१ लाख ६ हजार ८२८ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.९२ टक्क्यांवर आले असून, मृत्यूदर १.५८ टक्का आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३८ लाख ५४ हजार १८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३६ लाख ७५ हजार ५१८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून, २६ हजार ५२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

दिवसभरात नोंद झालेल्या ५०३ मृत्यूंपैकी २१० मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत, तर १२८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत, उर्वरित १६५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ५०३ मृत्यूंमध्ये मुंबई ५३, ठाणे १३, ठाणे मनपा ५, नवी मुंबई मनपा १४, कल्याण डोंबिवली मनपा १, उल्हासनगर मनपा १, मीरा भाईंदर मनपा ३, पालघर १, वसई विरार मनपा ३, रायगड १७, पनवेल मनपा ४, नाशिक २, नाशिक मनपा ३, अहमदनगर ६१, अहमदनगर मनपा २७, जळगाव २४, जळगाव मनपा १६, नंदूरबार १९, पुणे ९, पुणे मनपा ३६, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ४, सोलापूर मनपा १, सातारा ११, कोल्हापूर १, सांगली ४, सांगली मिरज कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग २, रत्नागिरी १, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ३, जालना ४, परभणी ९, परभणी मनपा ८, लातूर १३, लातूर मनपा ६, उस्मानाबाद १२, नांदेड १३, नांदेड मनपा ११, अकोला १, अकोला मनपा ४, अमरावती २, अमरावती मनपा १, यवतमाळ १०, वाशिम ४, नागपूर ५, नागपूर मनपा २२, वर्धा ५, भंडारा ३, गोंदिया १७, चंद्रपूर १, चंद्रपूर मनपा १, गडचिरोली २ आणि अन्य राज्य/देशातील १ इ. रुग्णांचा समावेश आहे.

देशाच्या तुलनेत राज्याचा मृत्यूदर अधिक, राज्याचा मृत्यूदर १.५९ टक्का, तर देशाचा मृत्यूदर १.२० टक्का

३१ ते ४० वयोगटात ८ लाख ११ हजार ९११, सर्वाधिक बाधित रुग्ण, एकूण रुग्णसंख्येत २१.८२ टक्के

एकूण मृत्यूंत ६१ टक्के पुरुष रुग्णांचे प्रमाण, तर ३९ टक्के महिला रुग्ण

राज्यात ५ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागाबाहेर ऑक्सिजनवर, तर तीन टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत

सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेले जिल्हे

जिल्हा रुग्णसंख्या

पुणे १,२२,४८६

ठाणे ८६,७३२

मुंबई ८६,६८८

नागपूर ७३,४८५

नाशिक ४२,५६३

Web Title: Daily high patient and mortality rates in the state again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.