राज्यातील दैनंदिन रुग्णवाढ चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:12 AM2021-02-20T04:12:07+5:302021-02-20T04:12:07+5:30
दिवसभरात ५,४२७ नवीन रुग्णांचे निदान, ३८ मृत्यू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात गुरुवारी ५,४२७ नवीन रुग्णांचे ...
दिवसभरात ५,४२७ नवीन रुग्णांचे निदान, ३८ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गुरुवारी ५,४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे काेरोनाबाधितांची एकूण संख्या २०,८१,५२० झाली असून बळींचा आकडा ५१ हजार ६६९ आहे. बुधवारी ४,७८७ नवीन रुग्णांचे निदान, तर ४० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली हाेेती.
गुरुवारी दिवसभरात २,५४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १९,८७,८०४ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५ टक्के झाले आहे. सध्या राज्यात ४०,८५८ रुग्ण उपचाराधीन आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५५,२१,१९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.४१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,१६,९०८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १,७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर २.४८ % एवढा आहे.