खुशखबर ! दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा १० हजारांच्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 07:33 AM2021-06-27T07:33:02+5:302021-06-27T07:33:31+5:30

राज्यात ३ कोटी ९ लाख  लाभार्थ्यांचे लसीकरण  

Daily number of patients again below 10,000 | खुशखबर ! दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा १० हजारांच्या खाली

खुशखबर ! दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा १० हजारांच्या खाली

Next

मुंबई : राज्यात शनिवारी ९,८१२ नवीन रुग्णांचे निदान आणि १७९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात ८,७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५७,८१,५५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के एवढे झाले आहे. राज्यात १,२१,२५१ रुग्ण उपचाराधीन आहेत.   राज्यात ६,२८,२९९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ४,२७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,२६,८४७ झाली आहे. 

राज्यात ३ कोटी ९ लाख  लाभार्थ्यांचे लसीकरण  
मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात ७ लाख २६ हजार ५८८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. राज्यात एकूण ३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.  
 

१८ ते ४४ वयोगटातील ४९ लाख ५७ हजार ६८५ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३८ लाख ४४ हजार ७ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १२ लाख ६७ हजार ७७१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ८ लाख २९ हजार ३१४ कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २० लाख ८४ हजार ३६२ कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर ८ लाख ९६ हजार ९५० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ६१ लाख ४७ हजार ५३८ लसीचा पहिला डोस, तर ३८ लाख ४४ हजार ७ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

मुंबईत ९ हजार १४८ रुग्ण उपचाराधीन
nमुंबईत शनिवारी ६४८ रुग्णांची नोंद झाली असून, १५ मृत्यूची नोंद झाली आहे. १९१९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ७१३ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ९ हजार १४८ सक्रिय रुग्ण आहेत.
nमुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा सात लाख १९ हजार ६१०वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा १५ हजार ३८३वर पोहचला आहे. आतापर्यंत रुग्ण बरे होण्याची संख्या ६ लाख ९२ हजार ७८७ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ७२३ दिवस आहे. 

Web Title: Daily number of patients again below 10,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.