Join us

दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा १० हजारांच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:05 AM

मुंबई - राज्यात शनिवारी ९,८१२ नवीन रुग्णांचे निदान आणि १७९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात ८,७५२ ...

मुंबई - राज्यात शनिवारी ९,८१२ नवीन रुग्णांचे निदान आणि १७९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात ८,७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५७,८१,५५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात १,२१,२५१ रुग्ण उपचाराधीन आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.० टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ८ लाख ३१ हजार ३३२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.७६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६,२८,२९९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ४,२७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,२६,८४७ झाली आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण १७९ मृत्यूंपैकी १०६ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ७३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या १७९ मृत्यूंमध्ये मुंबई १५, ठाणे ४, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा २, भिवंडी-निजामपूर मनपा १, पालघर २, वसई-विरार मनपा ६, रायगड १३ , पनवेल मनपा २, नाशिक २, नाशिक मनपा १०, अहमदनगर ३, पुणे ८, पुणे मनपा ६, सोलापूर ४, सातारा ९, कोल्हापूर २१, कोल्हापूर मनपा ९, सांगली ४, सांगली-मिरज-कुपवाड मनपा ५, सिंधुदुर्ग ८, रत्नागिरी १२, औरंगाबाद ९, औरंगाबाद मनपा ४, लातूर ३, लातूर मनपा २, उस्मानाबाद ३, बीड ५, अकोला २, बुलडाणा १, वर्धा १, भंडारा १, गडचिरोली १, इ. रुग्णांचा समावेश आहे.