मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या ५०० च्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:10 AM2021-09-09T04:10:08+5:302021-09-09T04:10:08+5:30

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढता असल्याचे दिसून आले आहे. शहर-उपनगरात बुधवारी दैनंदिन रुग्णसंख्येने ...

The daily number of patients in Mumbai exceeds 500 | मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या ५०० च्या पार

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या ५०० च्या पार

Next

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढता असल्याचे दिसून आले आहे. शहर-उपनगरात बुधवारी दैनंदिन रुग्णसंख्येने पाचशेचा आकडा ओलांडला.

शहर-उपनगरात बुधवारी ५३० रुग्णांची नोंद झाली असून, ४ मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख ४७ हजार ६०८ वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा १६ हजार ४ वर पोहोचला आहे. शहर-उपनगरात बरे झालेल्यांची संख्या ७ लाख २५ हजार २४७ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.

मुंबईत १ ते ७ सप्टेंबरपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर ०.०६ % टक्के असल्याची नोंद आहे. मुंबईत चाळ आणि झोपडपट्टीच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्राची नोंद झाली नाही. तर रुग्ण आढळून आल्याने ५० इमारती सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज ४८ हजार ५२१ चाचण्या तर आतापर्यंत एकूण ९५ लाख ५१ हजार ५४१ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Web Title: The daily number of patients in Mumbai exceeds 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.