Join us

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या ४०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:07 AM

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून कमी होत असलेला दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढीस लागला आहे. शहर उपनगरात गुरुवारी ...

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून कमी होत असलेला दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढीस लागला आहे. शहर उपनगरात गुरुवारी दैनंदिन रुग्णसंख्येने ४००चा टप्पा ओलांडला. शहर उपनगरात दिवसभरात ४४१ रुग्णांची नोंद झाली आहे, तीन मृत्यूंची नोंद झाली आहे.

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी एक हजार ४४६ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या तीन हजार ४१८ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात २०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या सात लाख २३ हजार १५५वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.

शहर उपनगरांत कोरोनाग्रस्तांचा आकडा सात लाख ४५ हजार १२वर पोहोचला आहे, मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९८४वर पोहोचला आहे. २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.०५ टक्के आहे. मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्राची नोंद नाही, तर ४७ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत.

कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ३७ हजार १६३, तर आतापर्यंत एकूण ९३ लाख २० हजार ६५६ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.