मुंबई : राज्यात नव्याने कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या उतरणीला लागली आहे. मंगळवारी १० हजार ८९१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, तर १६ हजार ५७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच दिवसभरात २९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत १ लाख १ हजार १७२ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ५२ हजार ८९१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील तब्बल ५५ लाख ८० हजार ९२५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९५.३५ एवढे झाले आहे, तर सध्या राज्यात एकूण १ लाख ६७ हजार ९२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ६९ लाख ७ हजार १८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख ५२ हजार ८९१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११ लाख ५३ हजार १४७ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ६ हजार २२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्य
आजचा मृत्यूदर - १.७३ टक्के
आजचे मृत्यू - २९५
आजचे रुग्ण - १०,८९१
सक्रिय रुग्ण - १,६७,२२५