राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यू वाढीचा आलेख कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:08 AM2021-04-30T04:08:51+5:302021-04-30T04:08:51+5:30

मुंबई : राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यू वाढीचा आलेख कायम आहे. दिवसभरात ६६ हजार १५९ रुग्णांचे निदान झाले असून, ...

The daily patient and death graph in the state continues to grow | राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यू वाढीचा आलेख कायम

राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यू वाढीचा आलेख कायम

Next

मुंबई : राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यू वाढीचा आलेख कायम आहे. दिवसभरात ६६ हजार १५९ रुग्णांचे निदान झाले असून, ७७१ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. तर गुरुवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ६८ हजार ५३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, ३७ लाख ९९ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सध्या ६ लाख ७० हजार ३०१ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.६९ टक्के असून, मृत्युदर १.५ टक्क्यांवर स्थिरावला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ६८ लाख १६ हजार ७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.९३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४१ लाख १९ हजार ७५९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३० हजार ११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात एकूण ४५ लाख ३९ हजार ५५३ कोरोनाबाधित असून, आतापर्यंत ६७ हजार ९८५ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ७७१ मृत्यूंमध्ये मुंबई ८२, ठाणे २, ठाणे मनपा १५, कल्याण डोंबिवली मनपा १७, उल्हासनगर मनपा ७, मीरा भाईंदर मनपा ६, वसई विरार मनपा २, रायगड २, पनवेल मनपा ११, नाशिक २०, नाशिक मनपा १५, अहमदनगर २४, अहमदनगर मनपा १४, जळगाव १३, जळगाव मनपा १७, नंदुरबार २६, पुणे ३६, पुणे मनपा ९४, पिंपरी चिंचवड मनपा १६, सोलापूर ९, सोलापूर मनपा २७, सातारा ३२, कोल्हापूर १४, कोल्हापूर मनपा ५, सांगली १९, सिंधुदुर्ग १२, रत्नागिरी ३, औरंगाबाद ९, औरंगाबाद मनपा १८, जालना १८, हिंगोली ५, परभणी ३, परभणी मनपा ४, लातूर २, लातूर मनपा २, उस्मानाबाद ७, बीड १६, नांदेड ६, नांदेड मनपा ५, अकोला मनपा १, अमरावती ४, अमरावती मनपा ४, यवतमाळ १६, वाशिम १५, नागपूर २३, नागपूर मनपा ४२, वर्धा ८, भंडारा १७, चंद्रपूर १, चंद्रपूर मनपा ५ इ. रुग्णांचा समावेश आहे.

पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

राज्यात सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात असून रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार ५२९ वर आहे. त्याखालोखाल नागपूरमध्ये ८० हजार २८, मुंबईत ६७ हजार २५५, ठाण्यात ५६ हजार ९७३ आणि नाशिकमध्ये ५२ हजार ९५४ रुग्ण उपचाराधीन आहेत.

देशात सर्वाधिक मृत्युदर असणारी पाच शहरे राज्यातील

देशातील १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि ठाणे ही ५ शहरे आहेत. मुंबईमध्ये तर मृत्युमुखी पडणारे आणि दररोजचे नवीन संक्रमित यांची टक्केवारी देशात सर्वाधिक १.५ टक्के इतकी वाढलेली आहे. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ३५ हजार कोरोना रुग्ण आढळले. त्यापैकी १२,९२० जणांचा मृत्यू झाला. पुण्यात आतापर्यंत ९ हजार ११४, ठाणे ६ हजार ६९२, नागपूर ४ हजार ९३२, नाशिक २ हजार ९५१ या शहरांमध्ये सर्वाधिक कोरोना बळी गेले असून, या सर्व शहरांतील मृत्युदर एक ते अडीच टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे. देशात सध्या या संसर्ग घातकतेचा मृत्युदर १.३ टक्के आहे. दिल्ली, चेन्नई, कोलकाता, जयपूर, अहमदाबाद, नागपूर आणि मुंबईसारख्या १५ शहरांत हा दर एक ते अडीच टक्‍क्‍यांपर्यंतही वाढला आहे.

Web Title: The daily patient and death graph in the state continues to grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.